बॉलिवूडची छपाक गर्ल दीपिका पदुकोण स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी झाली आहे. तिथे तिने मंगळवारी डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेएसस यांच्यासोबत (Dr.Tedros Adhanom Ghebreyesus) डिप्रेशनवर चर्चा केली. दीपिकाने या मंचावर मोकळेपणाने डिप्रेशनबद्दल सांगितलं.
ज्यापद्धतीने दीपिकाच्या डिप्रेशनसारख्या गंभीर मुद्द्यावरील मत ऐकून डॉ. टेड्रोस यांनी तिचे कौतूक केलं. त्यांनी ट्विटरवर याबद्दल सांगितलं. त्यांनी लिहिलं की, तुमच्यासोबत काम करण्यासाठी तत्पर आहे. मानसिक स्वास्थ्याशिवाय कोणते स्वास्थ नाही. #LetsTalk
त्यांच्या ट्विटनंतर दीपिकानेदेखील त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमात दीपिकाने सांगितलं की, एक दिवस जेव्हा सकाळी उठली तेव्हा बेशुद्ध झाली होती. सुदैवानं माझ्या घरातील सहायिकेनं मला जमिनीवर कोसळताना पाहिलं. मला डॉक्टरकडे नेले आणि डॉक्टरांनी सांगितलं की ब्लड प्रेशर व थकव्यामुळे असं झालं आहे. दीपिकाने सांगितलं कीस हे डिप्रेशनच्या आधीचे शारिरीक संकेत होते. जास्त वेळ मला फक्त झोपावसंच वाटत होते. बाहेर जावे आणि लोकांना भेटावेसं वाटत नव्हते.
दीपिका पुढे म्हणाली की, सुदैवानं त्याचवेळी माझी आई तिथे आली होती. जेव्हा माझे आई वडील पॅकिंग करत होते तेव्हा मी रडू लागले. त्यांनी मला विचारले की, हे काय होते आणि माझ्याकडे त्यावर काहीच उत्तर नव्हते. त्यावेळी माझ्या आईने मला तुला मानसिक तज्ज्ञांची गरज आहे आणि त्यानंतर एका मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घ्यायला सुरूवात केली.