Join us

अधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले

By कुणाल गवाणकर | Published: September 28, 2020 8:45 PM

अमली पदार्थ प्रकरणी दीपिका पादुकोणची एनसीबीकडून चौकशी

मुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना अमली पदार्थांचं कनेक्शन सुरू आहे. त्यामुळे आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांची चौकशी सुरू आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणचाही समावेश आहे. दीपिकानं एका व्हॉट्स ऍप चॅटमध्ये मालचा उल्लेख केला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून एनसीबीनं दीपिकाची चौकशी सुरू केली आहे.शनिवारी दीपिका चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात गेली होती. त्यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिला २०१७ च्या चॅटबद्दल प्रश्न विचारले. माल आहे का, असा प्रश्न तू चॅटमध्ये विचारला होतास. मालचा अर्थ काय?, असा सवाल अधिकाऱ्यांनी विचारला. त्यावर हो, मी तो प्रश्न विचारला होता. पण तुम्ही जो अर्थ काढलाय, त्या अर्थानं मी तो प्रश्न विचारला नव्हता, असं उत्तर दीपिकानं दिलं. आम्ही सिगारेटला माल म्हणतो. सिगारेटसाठी तो आमचा कोड वर्ड आहे, असं ती पुढे म्हणाली.ढसाढसा रडू लागली सोनम कपूरची बहिण रिया, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूकयानंतर एनसीबीनं हॅशवरून दीपिकाला प्रश्न विचारले. 'हॅश शब्दही तू चॅटमध्ये वापरला होतास. हॅश म्हणजे काय?', अशी विचारणा एनसीबीनं केली. या प्रश्नालादेखील दीपिकानं उत्तर दिलं. 'माल आम्ही सिगारेटला म्हणतो. हॅश आणि वीड वेगवेगळ्या प्रकारच्या सिगारेट आहेत. म्हणजे विविध ब्रँडच्या सिगारेट्स,' असं दीपिकानं अधिकाऱ्यांना सांगितलं.सुशांत प्रकरणात कुटुंबाचा मोठा खुलासा; "हा तपास CBI नं करावा ही आमची इच्छा नव्हती पण..."हॅश आणि वीड वेगवेगळ्या प्रकारच्या सिगारेट कशा असू शकतात, असा प्रश्न अधिकाऱ्यांनी पुढे विचारला. त्यावर पातळ सिगारेटला आम्ही हॅश म्हणतो आणि जाड सिगारेटला आम्ही वीड म्हणतो, असं उत्तर दीपिकानं दिलं.सिगारेट ओढतो, पण अमली पदार्थ घेत नाही- दीपिकाआम्ही सिगारेट ओढतो. पण अमली पदार्थ घेत नाही, असा दावा दीपिकानं केला. आपण सांगत असलेले कोड वर्ड योग्य असल्याचं म्हणत तिनं चित्रपट उद्योगातील संवादांचा दाखला दिला. इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार संवाद साधताना बऱ्याच कोडवर्ड्सचा वापर करतात, असं दीपिकानं सांगितलं.

टॅग्स :दीपिका पादुकोणसुशांत सिंग रजपूत