Join us

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर दीपिका पादुकोण स्पष्टच बोलली, म्हणाली, "नाव कमावण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 4:04 PM

दीपिकाने पहिल्यांदाच नेपोटिझमवर भाष्य केलं आहे.  नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील स्ट्रगलबद्दल भाष्य करताना नेपोटिझमवरही मौन सोडलं.

बॉलिवूड म्हटलं की स्टारकिड आणि नेपोटिझम हा विषय कायमच चर्चेत असतो. अनेक स्टारकिड त्यांच्या गॉड फादरचा हात पकडून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. पण, कोणताही गॉड फादर नसताना केवळ अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव मिळवलेलेही अनेक कलाकार आहेत. यापैकीच एक म्हणजे दीपिका पदुकोण. 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिकाने अल्पावधतीच सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमधील नामावंत दिग्दर्शकांच्या चित्रपटांत काम केलेल्या दीपिकाने पहिल्यांदाच नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. 

दीपिकाने नुकतीच 'वोग'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील स्ट्रगलबद्दल भाष्य करताना नेपोटिझमवरही मौन सोडलं. ती म्हणाली, "माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. एक अशा क्षेत्रात नाव कमावण्यासाठी प्रयत्न करणं, जिथे तुम्हाला कोणीच ओळखत नाही, हे कठीण काम आहे. आजकाल नेपोटिझम नावाची नवी गोष्ट लोकांनी सुरू केली आहे. पण, ही गोष्ट आधीदेखील होती, आताही आहे आणि या पुढेदेखील असणार आहे." 

"व्यावसायिक आयुष्याबरोबरच मी वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टींचा सामना करत होते. मी माझं घर सोडून शहरात आले होते. तेव्हा मी एक मुलगी होते. कुटुंब आणि मित्रमैत्रिणींना सोडून अनोळखी शहरात राहायला आलेली मी एक मुलगी होते. त्यामुळे मला माझ्या राहण्याची, खाण्यापिण्याची काळजी स्वत:लाच घ्यायची होती. पण, मी कधीच याकडे ओझं म्हणून पाहिलं नाही," असंही पुडे दीपिका म्हणाली. 

दीपिका लवकरच 'फायटर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती हृतिक रोशनबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याबरोबर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्येही दीपिकाची वर्णी लागली आहे. या चित्रपटात ती डॅशिंग महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.  

टॅग्स :दीपिका पादुकोणसेलिब्रिटी