Join us

या अभिनेत्रीने दिले आहेत संजय लीला भन्साळीसोबत हिट चित्रपट, पुन्हा करणार त्याच्यासोबत काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 16:04 IST

या अभिनेत्रीला नुकतेच संजय लीला भन्साळीच्या ऑफिसच्या बाहेर पाहाण्यात आले.

ठळक मुद्देदीपिकाला नुकतेच संजय लीला भन्साळीच्या ऑफिसच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यामुळे संजय आणि दीपिका हे लवकरच त्यांच्या नव्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.

संजय लीला भन्साळीने आजवर हम दिल दे चुके सनम, देवदास, बाजीराव मस्तानी, पद्मावत, ब्लॅक, मेरी कोम, गलियों का रासलीला रामलीला यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. पद्मावत, गलियों का रासलीला रामलीला आणि बाजीराव मस्तानी या त्याच्या चित्रपटात आपल्याला दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. दीपिकाला या दोन्ही चित्रपटांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दीपिकाचा छपाक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला समीक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलेच कलेक्शन केले आहे. दीपिका आणि संजय लीला भन्साळीच्या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा ही जोडी एका नव्या चित्रपटाच्या तयारीला लागली असल्याची चर्चा रंगली आहे. 

दीपिकाला नुकतेच संजय लीला भन्साळीच्या ऑफिसच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यामुळे संजय आणि दीपिका हे लवकरच त्यांच्या नव्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या तरी संजय लीला भन्साळी गंगुबाई काठियावाडी या त्याच्या चित्रपटात व्यग्र असून या चित्रपटात आलिया भट मुख्य भूमिकेत दिसत आहे तर दीपिका पती रणवीर सिंहसोबत 83 या चित्रपटात झळकणार आहे. तसेच द इंटर्न या हॉलिवूड चित्रपटात ती ऋषी कपूरसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :संजय लीला भन्साळीदीपिका पादुकोण