Join us  

अभिनेत्री नसती तर दीपिका पादुकोण असती एक मोठी कवयित्री! हा घ्या पुरावा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 8:58 AM

दीपिका पादुकोण ही केवळ एक गुणी अभिनेत्रीचं नाही तर त्याशिवायही अनेक सुप्त गुण तिच्यात दडलेले आहेत. होय, तुम्हाला विश्वास ...

दीपिका पादुकोण ही केवळ एक गुणी अभिनेत्रीचं नाही तर त्याशिवायही अनेक सुप्त गुण तिच्यात दडलेले आहेत. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आमच्याकडे पुरावा आहे. बॉलिवूडच्या बड्या बड्या हिरोंपेक्षा अधिक मानधन घेणाºया दीपिकात एक कवयित्री लपलेली आहे. तुम्हाला खरे वाटणार नाही, पण हे खरे आहे. याच्या पुराव्यादाखल दीपिकाने सातवीत असताना लिहिलेली एक कविता आमच्याकडे आहे.  खुद्द दीपिकाने ही कविता तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केली आहे.  ‘ I am’ असे या कवितेचे शीर्षक आहे. I am a child with love and care; I wonder how far the stars reach; I hear the rush of the waves...  अशा या कवितेची सुरूवात आहे. ‘सातव्या वर्गात कविता लिहिण्याचा माझा पहिला प्रयत्न....’ असे कॅप्शन देत दीपिकाने तिची ही पहिली कविता शेअर केली आहे. या कवितेचे शब्द दीपिकाच्या प्रगल्भतेची दाद देणारे आहेत. सातव्या वर्गातील मुलगी इतकी प्रगल्भ शब्द निवडू शकते, इतकी प्रगल्भ कल्पना कवितेत मांडू शकते, यावर क्षणभर विश्वास होत नाही. दीपिकाची ही कविता बघता, तिच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाचीही प्रचिती येते. दीपिकाने कधीच लहान स्वप्ने बघितली नाहीत, हेच यावरून दिसते. दीपिकाची ही कविता तुम्हीही वाचायला हवी आणि केवळ वाचायचीच नाही तर त्याबद्दलच्या प्रतिक्रियाही आम्हाला कळवायला हव्यात. सध्या तरी एका व्यक्तीला दीपिकाची ही कविता प्रचंड आवडली आहे. ही व्यक्ती कोण? याचा अंदाज तुम्ही सहज बांधू शकताच. होय, रणवीर सिंग.   दीपिका लवकरच रणवीर सिंगसोबत लग्न बंधनात अडकणार, अशी चर्चा सध्या जोरात आहे. दोघेही अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्यासारखे डेस्टिनेशल वेडिंग करणार, असेही म्हटले जात आहे.ALSO READ : ​पुन्हा एकदा संजय लीला भन्साळींच्या जाळ्यात अडकले रणवीर सिंग व दीपिका पादुकोण!दीपिकाचा अलीकडे आलेला ‘पद्मावत’ हा चित्रपट चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा ओलांडल्याने दीपिका सध्या चांगलीच खूश आहे. या चित्रपटानंतर दीपिका ‘सपना दीदी’ या चित्रपटात दिसणार आहे.