Join us

दीपिकाने न्यूयॉर्कमध्ये घातलेल्या ब्लेझरची किंमत ऐकून तुम्हाला येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 6:00 AM

दीपिका पादुकोणकडे बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आणि स्टाईल आयकोन म्हणून पाहिलं जाते. डिप्पी तिच्या फॅशनला घेऊन सुद्धा तितकीच चर्चेत असते

ठळक मुद्देडिप्पी तिच्या फॅशनला घेऊन सुद्धा तितकीच चर्चेत असतेया इव्हेंटमध्ये ती ब्लॅक ब्लेझर आणि बाइड लेग्ड पॅन्टमध्ये दिसली.

दीपिका पादुकोणकडे बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आणि स्टाईल आयकोन म्हणून पाहिलं जाते. सध्या ती आगामी सिनेमा '83'मध्ये घेतलेल्या मानधनांमुळे चर्चेत आहे. डिप्पी तिच्या फॅशनला घेऊन सुद्धा तितकीच चर्चेत असते. नुकतीच ती न्यूयॉर्कमध्ये एका इव्हेंटला गेली होती. दीपिकानं या इव्हेंटचे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या इव्हेंटमध्ये ती ब्लॅक ब्लेझर आणि बाइड लेग्ड पॅन्टमध्ये दिसली. यासोबतच दीपिकानं पॉइंटेड टो हिल्स आणि गोल्ड ईअररिंग्स सुद्धा घातले होते. या लूकमध्ये दीपिका खुपच ब्युटीफूल दिसत होती.  

दीपिकाचा हा लूक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. दीपिकाने परिधान केलेल्या Alberta Ferretti फ्रिंज ब्लेझरची किंमत ऐकून तुम्हीही आवाक् व्हाल. दीपिका घातलेल्या ब्लेझरची किंमत तब्बल १,७४५ अमेरिकन डॉलर  म्हणजेच जवळपास १ लाख २१ हजार रूपये इतकी. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, नुकतंच दीपिकाने छपाक सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. दीपिका पादुकोण छपाक चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या चित्रपटात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा रेखाटण्यात आली आहे. यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे.

तसेच  लग्नानंतर ती पहिल्यांदाच रणवीर सिंगसोबत '८३'मध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. यात ती रणवीरच्या पत्नी भूमिका साकारणार आहे.  '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता

टॅग्स :दीपिका पादुकोण