केवळ अॅक्टिंग हेच नाही दीपिका पादुकोणच्या कमाईचे साधन, कोट्यवधींचा आहे बिझनेस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 03:57 PM2019-12-20T15:57:50+5:302019-12-20T15:58:53+5:30
दीपिका चित्रपटातून कोट्यावधीची कमाई करते, असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. कारण केवळ अॅक्टिंग नाही तर तिचे आणखीही अनेक बिझनेस आहे.
दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्यामुळे दीपिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण सध्या दीपिका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. होय, फोर्ब्सने जारी केलेल्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणा-या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका 10 व्या क्रमांकावर आहे. दीपिकाची यंदाची कमाई 48 कोटी रूपये असल्याचा दावा फोर्ब्सने केला आहे. पण दीपिका चित्रपटातून कोट्यावधीची कमाई करते, असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. कारण केवळ अॅक्टिंग नाही तर तिचे आणखीही अनेक बिझनेस आहे.
अनेक बिझनेसमध्ये तिने पैसा गुंतवला आहे. नुकतीच दीपिकाने इलेक्ट्रिक टॅक्सी स्टार्टअप ब्ल्यू स्मार्टमध्ये 30 लाख डॉलरची गुंतवणूक केली. यापूर्वी ड्रम्स फूड आणि एक स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्टअप ऐरोस्पेसमध्येही तिने पैसे गुंतवले आहेत.
याशिवाय अनेक ब्रँडच्या जाहिराती, फोटोशूट आणि सोशल मीडिया शेअरिंग मधूनही दीपिका कोट्यावधी रूपये कमावते. दीपिका मिंत्रा,तनिष्क, लॉरेल अशा अनेक बड्या बँडशी जुळलेली आहे.
दीपिकाने 2018 च्या नोव्हेंबरमध्ये अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले. लग्नानंतर तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे यंदा तिची कमाई काहीशी कमी झालीय. गत वर्षी फोर्ब्सच्या यादीत दीपिका 4 व्या क्रमांकावर होती. यंदा ती थेट 10 स्थानावर घसरली. 2019 मध्ये अद्याप दीपिकाचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही, हेच याचे कारण आहे.
रणवीरने मात्र यंदा या यादीत 8 व्या क्रमांकावरून 7 व्या क्रमांकावर उडी घेतली. 2018 ते 2019 मध्ये त्याने बॅक टू बॅक हिट सिनेमे दिलेत. पद्मावत, सिम्बा, गली बॉय हे त्याचे तीनही चित्रपट सुपरडुपर हिट राहिले.