Join us

दीपिका पादुकोणची डिप्रेशनसोबतची लढाई वाचायला मिळणार पुस्तकात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 7:21 PM

एकेकाळी दीपिका डिप्रेशनमध्ये होती. त्यावेळी तिने या समस्येला सामारे जात त्यावर मात केली. आज ती प्रोफेशनल व पर्सनल लाइफ एन्जॉय करत आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोणने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तिने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. एकेकाळी दीपिका डिप्रेशनमध्ये होती. त्यावेळी तिने या समस्येला सामारे जात त्यावर मात केली. आज ती प्रोफेशनल व पर्सनल लाइफ एन्जॉय करत आहे. 

दीपिकाने आपल्या आयुष्यातील तणावाबद्दल बऱ्याचदा बोलताना दिसते. हे सांगताना ती कित्येक वेळेला भावूकही झाली आहे. इतकेच नाही तर डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना तिने आत्मविश्वासही दिला आहे. आता दीपिका तिची ही डिप्रेशनची लढाई पुस्तकरुपी रसिकांच्या समोर आणणार आहे. ही कथा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे वाचू शकतात. या पुस्तकाचे नाव असणार 'द डॉट दॅट वेंट फॉर अ वॉक'. हे पुस्तक लक्ष्मी नांबियर, रिमा गुप्ता व शारदा अक्किनेनी यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लहानांपासून महिलांमध्ये आत्मविश्वास व धाडसी वृत्ती निर्माण करण्याचा उद्देश आहे. यासोबतच या पुस्तकात ५१ महिलांच्या संघर्षाची कथा वाचायला मिळणार आहे आणि वाचकांना यातून प्रेरणा मिळणार आहे. शारदा अक्किनेनी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, दीपिका आपल्या चॅप्टरबद्दल बोलताना खूप खूश होती. दीपिकाचे चाहते हे पुस्तक वाचण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

दीपिकाने आगामी सिनेमा 'छपाक'चे काम सुरू केले. दीपिकाने सिनेमातील निगडीत व्यक्तींसोबत बैठक केली व या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रोस्थेटिक मेकअपची करण्याची गरज आहे की नाही, यावर सल्ले घेतले. 'छपाक' चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करणार आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोण