कान्सच्या पहिल्या दिवशी काहीसा असा होता दीपिका पादुकोणचा जलवा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 7:06 AM
दीपिका पादुकोणने कान्स फिल्म फेस्टिवल ख-या अर्थाने गाजवतेय, असे म्हणायला हरकत नाही. कान्सच्या पहिल्या दिवशी दीपिकाचा जलवा पाहण्यासारखा होता. ...
दीपिका पादुकोणने कान्स फिल्म फेस्टिवल ख-या अर्थाने गाजवतेय, असे म्हणायला हरकत नाही. कान्सच्या पहिल्या दिवशी दीपिकाचा जलवा पाहण्यासारखा होता. सध्या कान्स सोहळ्याच्या निमित्ताने दीपिका फ्रान्समध्ये आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर ती एका इंटरनॅशनल फॅशन ब्रँडचे प्रतिनिधित्व करतेय. यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी दीपिका पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आणि सगळ्यांचे डोळे तिच्यावर टीकलेतं. कान्स सोहळ्याच्या रेड कार्पेटवर या ‘मस्तानी’चे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वप्रथम दीपिकाचे मेकअप करतानाचे फोटो व्हायरल झालेत. कान्ससाठी तयार होणाºया दीपिकाच्या चेहºयावरचा या फोटोंमधील आत्मविश्वास बघण्यासारखा आहे. मेकअप करताना दीपिका पांढ-यारंगाचा मेकअप टॉवेलमध्ये दिसली. यानंतर दीपिका लाल रंगाच्या मॅक्सी गाऊन निवडला. मीडियाशी बोलताना दीपिकाने हा रेड प्रिंटेड गाऊन कॅरी केला होता. या गाऊनमध्येही दीपिका कमालीची सुंदर दिसली. यानंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती, ती दीपिकाच्या रेड कार्पेटवरील लूकचा. रेड कार्पेटवर दीपिका कुठल्या आऊटफिटमध्ये उतरते,कशी दिसते, हे पाहण्यास सगळे उत्सूक होते आणि अखेर तो क्षण आला. दीपिका वाइन कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ALSO READ : Cannes 2017 : ऐश्वर्या, सोनम, दीपिकानंतर मल्लिका शेरावतचाही बघायला मिळेल जलवा!या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर तेवढीच हॉट अन् सेक्सी दिसत होती. ड्रेससोबतचा तिचा स्मोकी डार्क मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालणारा होता. ज्वेलरी म्हणाल तर ड्रेससोबत मॅच होणारे इअररिंग्स आणि बोटात एक अंगठी एवढेच तिने घातले होते. कान्सकडे संपूर्ण जगाच्या नजरा या सोहळ्याकडे लागलेल्या असतात. यंदा भारतीयांनाही या सोहळ्याची आतुरतेने प्रतीक्षा होती. त्याचे कारणही म्हणजे, बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन, बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण या तीन अभिनेत्री यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहेत. यापैकी दीपिकाचा फर्स्ट लूक आपण पाहिलात. आता ऐश्वर्या व सोनम कान्स सोहळा किती गाजवतात तेही बघूच.