Join us

​दीपिका पादुकोणच्या ‘सौतन’ची होतेय, जोरदार चर्चा... जाणून घ्या, कोण आहे ही मिस्ट्री वूमन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 7:59 AM

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ची चर्चा जोरात आहे. जशी जशी रिलीज डेट जवळ येतेय, तसा तसा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला ...

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ची चर्चा जोरात आहे. जशी जशी रिलीज डेट जवळ येतेय, तसा तसा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ‘पद्मावती’च्या पोस्टरपासून तर ट्रेलरपर्यंत सगळे काही जोरदार आहे. त्यात दीपिका पादुकोणच्या ‘घूमर’ गाण्याने तर सगळीकडे धूम केली आहे. ‘घूमर’मधील दीपिकाचा अंदाज पाहण्याजोगा आहे. दीपिकाचे हे गाणे तुम्ही पाहिले असेल तर त्यात दोन चेहरे आणखी दिसतात. एक म्हणजे महारावल रतन सिंगच्या भूमिकेतील शाहिद कपूर आणि दीपिकाची ‘सौतन’ बनलेली अनुप्रिया.होय, अनुप्रिया या चित्रपटात राणी नागमतीच्या भूमिकेत दिसणार आहे. राणी नागमती ही महारावल रतन सिंगची पहिली पत्नी होती. कवी मलिक मुहम्मद जायसीने आपल्या ‘पद्मावत’ या महाकाव्यात राजा रावल रतन सिंगच्या दोन विवाहांचा उल्लेख केला होता. या महाकाव्यातील नागमती वियोग खंड बराच लोकप्रीय आहे.‘घूमर’ गाण्यात एकीकडे दीपिका चर्चेत आली तर दुसरीकडे अनुप्रियावरही लोकांच्या नजरा खिळल्या. अनुप्रियाचे पूर्ण नाव अनुप्रिया गोयंका आहे. ३० वर्षांची अनुप्रिया पेशाने मॉडेल आहे. २०१३ मध्ये तिने ‘पोतुगाडू’ या तेलगू चित्रपटातून अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. यानंतर ती बॉलिवूडमध्येही दिसली. ‘पाठशाला’,‘बॉबी जासूस’, ‘डॅडी’ आणि ‘ढिशूम’मध्ये अनुप्रियाने काम केलेयं. अर्थात हे चित्रपट अनुप्रियाला मोठी ओळख देऊ शकले नाहीत. पण आता दीपिकाची ‘सौतन’ बनून अनुप्रिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही भूमिका अनुप्रियाला किती ओळख मिळवून देते, ते बघूच.ALSO READ: ​दीपिका पादुकोणचे ‘घूमर’ नृत्य पाहून व्हाल दंग! ‘पद्मावती’चे पहिले गाणे रिलीज !!‘पद्मावती’मधील ‘घूमर’ गाणे सध्या सगळ्यांच्या ओठांवर आहे. पाच दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला आत्तापर्यंत तीन कोटींवर लोंकांनी पाहिले आहे. ‘घूमर’ हा एक राजस्थानी नृत्य प्रकार आहे. या  प्रकारात राजस्थानी महिला एक गोल वतूर्ळाकार फेर धरून नृत्य करतात. नववधू सासरी येते, तेव्हा तिचे स्वागत या नृत्याने केले जाते. राजस्थानात आजही सणवार, आनंदाच्या प्रसंगी हे नृत्य केले जाते.या चित्रपटात दीपिका पादुकोण राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर शाहिद कपूर तिच्या पतीच्या अर्थात महारावल रतन सिंगची भूमिका साकारणार आहे. अभिनेता रणवीर सिंग याने या चित्रपटात सुल्तान अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारली आहे.