अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. अलिकडेच दीपिकानं ब्रँड 82°E चं प्रमोशन केलं. यात तिने पिवळ्या रंगाचा मॅटर्निटी गाऊन घातला आहे. यात तिचा बेबीबंप स्पष्ट दिसून आला. शिवाय तिच्या प्रेग्नंसी ग्लोनेदेखील लक्ष वेधून घेतलं. यावेळी दीपिकानं परिधान केलेल्या मॅटर्निटी गाऊनबद्दल अपडेट समोर आलं आहे.
दीपिकानं स्वतः या मॅटर्निटी गाऊनचा लिलाव झाल्याची माहिती दिली आहे. तिनं इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'फ्रेश ऑफ द रॅक!' हा कुणाला मिळाला? नेहमीप्रमाणेच, @tlllfoundation. चॅरिटीसाठी 'फ्रेश ऑफ द रॅक' उपक्रमाचा भाग म्हणून हा मॅटर्निटी गाऊन लिलावासाठी ठेवण्यात आला. दीपिकाचा हा मॅटर्निटी गाऊन ३४ हजार रुपयांना विकला गेला आहे. अभिनेत्री या मॅटर्निटी गाऊनचे पैसे दान करणार आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये स्टार कपलने खुलासा केला आहे की,"सप्टेंबर 2024 मध्ये त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे".
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तिचा 'फायटर' (Fighter) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दीपिकाचा अजय देवगन स्टारर 'सिंघम अगेन' (Singham Again) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अजय देवगनच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातही अभिनेत्री झळकणार आहे.