रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण लग्न आज सिंधी पद्धतीने होणार आहे. बुधवारी 14 नोव्हेंबर या कलपने कोंकणी पद्धतीने लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. ‘आनंद कारज’ विधी संपन्न होणार आहे.‘आनंद कारज’मध्ये प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो.‘आनंद कारज’चा विधीत गुरुग्रंथ साहिबचा पाठ केला जातो. यादरम्यान सर्वांच्या डोक्यावर पगडी अर्थात सरापा असतो. ‘आनंद कारज’नंतर दीपवीर सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत.
रिपोर्टनुसार दोघांचे फॅन लग्नाच्या फोटोचे मोठ्या आतुरतेने वाट पाहतायेत. लवकरच दोघे आपल्या फॅन्ससाठी लग्नाचा फोटो शेअर करणार असल्याचे समजतेय. दीपिका व रणवीरने आपल्या लग्नाचे फोटो शेअर होऊ नयेत, यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. इटलीतील लेक कोमोमधील वेडिंग मेन्यूवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांच्या मोबाईल कॅमे-याला स्टिकर लावण्यापासून तर ड्रोनवर बंदी घालण्यापर्यंतचा सगळा चोख बंदोबस्त होता.
दीपिकाला आवडणाऱ्या वॉटर लिलीच्या फुलांनी लग्नाचा मंडप सजवण्यात आला होता. मंत्रोच्चाराचे आवाज विलाच्या बाहेरही ऐकू येत होते. अद्याप दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आलेले नाहीत.बधुवारी लग्नाच्या वेळी दीपिकाने सब्यसाचीने डिझाइन केलेला लहंगा घातला होता. तर रणवीर सिंगने रणवीरचा एक पांढ-या शेरवानीतील फोटो लीक झाला आहे. या फोटोत रणवीर अगदी परफेक्ट दिसतो आहे.