Join us  

​तो दीपिकाचा ‘पद्मावती’ लूक नव्हेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 11:30 AM

सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या अतिफास्ट युगात एखादी गोष्टी दीर्घकाळ लपून राहणे तसे अवघडच आहे. निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते त्यांच्या आगामी हाय-प्रोफाईल चित्रपटातील ...

सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या अतिफास्ट युगात एखादी गोष्टी दीर्घकाळ लपून राहणे तसे अवघडच आहे. निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते त्यांच्या आगामी हाय-प्रोफाईल चित्रपटातील लूक शक्य तेवढा लपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु सोशल मीडियावर कुठून ना कुठून त्याचे फोटो लीक होतातच.त्यामुळे काल जेव्हाइंटरनेटवर दीपिकाच्या‘पद्मावती’मधील लूकचे स्केचेस दाखल झाले तेव्हा एकच चर्चा सुरू झाली. ऐतिहासिक प्रेमकथा ‘पद्मावती’मधील दीपिकाचा लूक कसा असेल याविषयी असणारी कमालीची उत्सुकता पाहता हे स्केच फोटोज् प्रचंड व्हायरल झाले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ते फोटो सिनेमाच्या कास्टिंग डिरेक्टरच्या फेसबुक पेजवर पोस्ट झाले असल्यामुळे त्यांची सत्यता वाढली.                                            परंतु हे फोटोज् खरे नसल्याचा खुलासा स्वत: चित्रपटाच्या कास्टिंग डिरेक्टरने केला आहे. श्रुती महाजनने फेसबुकवर एका पोस्टद्वारे सांगितले की, ‘सध्या व्हायरल होत असलेले दीपिकाचे स्केचेस म्हणजे तिचा ‘पद्मावती’मधील लूक नसून ज्या फेसबुक पेजवरून ते पोस्ट करण्यात आले ते माझे पेज नाही. तो लूक पद्मावतीचा मुळीच नसून सर्वांनी किमान एकदा तरी फोटोची सत्यता पडताळून घ्यावी.’स्केचेसमध्ये दीपिका राजेशाही वेशभूषेत दिसत असून दागदागिन्यांनी ती सजलेली आहे. हे स्केचेस दीपिकाचा डाय हार्ड फॅन पृथ्वी प्रभूने काढलेले असून त्याने स्वत:हून पुढे येऊन याचा खुलासा केला की, ‘हे स्केचेस संपूर्णपणे माझ्या कल्पनेचा अविष्कार असून दीपिकाला केवळ शुभेच्छा देण्यासाठी काढलेले आहेत. हा तिचा ‘पद्मावती’ लूक आहे, असे मी कुठेच म्हटलेले नाही.’                                या ऐतिहासिक प्रेमकहाणीमध्ये दीपिका राणी पद्मावतीच्या भूमिकेत असून शाहिद कपूर राजा रतन सिंगची भूमिका साकारत आहे. भंसाळीचा फेव्हरेट रणवीर मुघल सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘राम-लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’नंतर भंसाळी-दीपिका-रणवीर हे त्रिकुट या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे.