Join us

दीप्ती नवल यांना धमकीचा ई-मेल, मागितली ४ लाखांची खंडणी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 2:05 PM

‘चश्मे बद्दूर’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांना एका ई-मेलद्वारे सुमारे ४ लाख रूपयांची खंडणी मागितली गेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देदीप्ती नवल यांना एक धमकीचा ईमेल प्राप्त झालादीप्ती नवल यांनी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे

‘चश्मे बद्दूर’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांना एका ई-मेलद्वारे सुमारे ४ लाख रूपयांची खंडणी मागितली गेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. दीप्ती नवल यांनी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ट्रॅश मेलमधील अशा धमकींच्या ई-मेलला काहीही अर्थ नाही, त्याकडे दुर्लक्ष करायला हवे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

दीप्ती नवल यांना एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला. २४ तासांच्या आत ३.९ लाख रूपये दे, अन्यथा तुझी इंटरनेट ब्राऊजिंग हिस्टी सार्वजनिक करू, असे या ई-मेलमध्ये लिहिले असल्याचे कळते. हा ई-मेल प्राप्त होताच दीप्ती नवल यांनी पोलिसांत धाव घेतली. तथापि याप्रकरणी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सायबर सेलमध्ये मदतीने हा ई-मेल कोणत्या सर्व्हरवरून पाठवला गेला होता, याचा पोलिस शोध घेत आहेत. साईबर क्राईम एक्सपर्ट रितेश भाटिया यांनाही गत २५ जूनला असाच एक ई-मेल आला होता. यात ३००० बिटकॉईन मागितले गेले होते. मात्र रितेश भाटिया यांनी या ई-मेलकडे दुर्लक्ष केले. कारण हा मेल बनावट असल्याचे त्यांना माहित होते. गत दोन आठवड्यात मला असे ई-मेल प्राप्त झालेल्या जवळपास २० लोकांचे फोन कॉल्स आल्याची माहिती रितेश भाटिया यांनी दिली आहे. भाटिया यांच्या मते, असे धमकीचे ई-मेल पाठवणा-यांकडे तुमचे कुठलेही फोटो वा व्हिडिओ नसतात. त्यांनी तुमचा योग्य ईमेल आयडी आणि पासवर्ड पाठवला याचा अर्थ त्यांनी तुमचा संपूर्ण डिवाईस हॅक केला असा नाही.