दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर दीपिका-रणवीर, दीपवीर हे हॅशटॅग ट्रेंड होणे सुरू झाले. केवळ इतकेच नाही तर मजेशीर मीम्सचाही पाऊस पडला. लोकांनी रणवीर व दीपिकावर एकापेक्षा एक भन्नाट मीम्स बनवत, अगदी धम्माल केली.या मीम्समध्ये रणवीर सिंगच्या फॅशन सेन्सपासून तर दोघांच्या मोबाईल ब्रँडपर्यंतचे मीम्स व्हायरल झालेत.अनेक युजर्सनी रणवीरच्या यानिमित्ताने रणवीर सिंगच्या अतरंगी फॅशन सेन्सची खिल्ली उडवली. आपल्या लग्नात रणवीर सिंग शेरवानी घालेल की घागरा, असा प्रश्न एका युजरने विचारला.
#DeepVeer : दीपिका-रणवीरच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स पाहा अन् पोट धरून हसा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 9:48 PM