Join us

DeepVeer Reception:'दीपवीर'ची रिसेप्शनला येणाऱ्या पाहुण्यांना 'ही' विशेष विनंती, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:10 PM

१४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं.दीपिकाने इटलीमध्ये झालेल्या दोन्ही प्रकारच्या विवाह सोहळ्यात सब्यासाचीने डिझायन केलेले ड्रेसस परिधान केले होते. 

मुंबईत दीपिका रणवीर यांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा रंगला आहे. या सोहळ्यात दीपवीरचा गोल्डन रॉयल लूक साऱ्यांसाठी चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे. या सोहळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीसह मुंबईतील अनेक नामवंत मंडळींनी हजेरी लावली आहे. या सोहळ्यात सामील होणाऱ्या निमंत्रितांना दीपवीरनं विशेष विनंती केली आहे. दीपिका आणि रणवीर दोघंही हे 'द लिव लव लाफ' फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला पाठिंबा देतात. त्यामुळे रिसेप्शन सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांनी येताना भेट किंवा गिफ्ट देण्याऐवजी या सामाजिक संस्थेला मदत करावी अशी विनंती दीपवीरने केली आहे. 

 

 यावेळी दीपिकासह स्टेजवर दीपिकाची बहिण अनीशा पादुकोणही उपस्थित आहे. अनीशाचा आऊटफिटही साऱ्यांच्या नजरा आकर्षित करत आहे. रणवीरची बहिण रितीका भवनानीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. रणवीरचे आई-वडिल जगजीत आणि अंजू भवनानी यांनीही काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर दीपिकाचे आईवडिल प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला पादुकोण यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. इटलीतील लेक कोमो  इथं दीपिका आणि रणवीर यांचं शुभमंगल पार पडलं. १४ नोव्हेंबरला कोंकणी पद्धतीने तर १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने दोघांचं लग्न पार पडलं.दीपिकाने इटलीमध्ये झालेल्या दोन्ही प्रकारच्या विवाह सोहळ्यात सब्यासाचीने डिझायन केलेले ड्रेसस परिधान केले होते. 

तसेच मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यानंतर १ डिसेंबरला दोघांचा रिसेप्शन सोहळा रंगणार आहे. यावेळी अनेक सेलिब्रिटी सहभागी होण्याची शक्यता आहे. हे रिसेप्शन केवळ बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी असेल.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी  पहिले रिसेप्शन बेंगळुरु इथं दिले होते. बंगळुरुच्या लीला पॅलेसमध्ये हा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बेंगळुरुच्या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॅडमिंटन जगतातील अनेक मन्यावरांनी उपस्थितीत लावली होती . हे रिसेप्शन दीपिकाच्या आई-वडिलांनाकडून आयोजित करण्यात आले होते. 

इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडले. त्यांच्या मेहेंदी सेरेमनीतील एक फोटो तर सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या फोटोत दीपिकासोबत एक मुलगी दिसत असून ती खूपच सुंदर असल्याचे नेटकरींचे म्हणणे आहे. दीपिका पादुकोणसोबत या फोटोत दिसणारी मुलगी दुसरी कोणी नाही तर रणवीर सिंगची बहीण आहे. तिचे नाव रितिका भवनानी ती नेहमीच मीडियापासून दूर राहाणेच पसंत करते. रणवीर लग्नासाठी इटलीला रवाना झाला, त्यावेळी देखील रितिका त्याच्यासोबतच होती. रितिका ही रणवीरची मोठी बहीण असून एका आईप्रमाणेच ती त्याचा सांभाळ करते आणि त्यामुळे रणवीर तिला दीदी अशी हाक न मारता छोटी माँ हाक मारतो. रणवीर आणि त्याच्या बहिणीचे बॉण्डिंग खूपच छान आहे. तिला रणवीरसोबत अनेक ठिकाणी पाहाण्यात येते.

टॅग्स :दीपिका पादुकोणरणवीर सिंगदीप- वीर