Join us

रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 03, 2021 8:17 AM

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. तिच्या या ट्विटनंतर बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौतनेही हल्ला चढवला आहे.

ठळक मुद्देदिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे.रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. तिच्या या ट्विटनंतर बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौतनेही हल्ला चढवला आहे.केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

नवी दिल्ली - केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांहूनही अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. 

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. याच शेतकऱ्यांचा आवाज आता प्रसिद्ध सिंगर आणि परफॉर्मर रिहानापर्यंतही पोहोचला आहे. रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. तिच्या या ट्विटनंतर बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौतनेही हल्ला चढवला आहे.

कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

रिहानाने ट्विटरवर एक न्यूज शेअर केली आहे. यात शेतकरी आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे. रिहानाने या न्यूज बरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे, यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत? #FarmersProtest.

आपल्यापासून सत्य लपवले गेले...! कंगना राणौतचे नथुराम गोडसेच्या समर्थनात ट्वीट

कंगनाचं उत्तर -रिहानाच्या ट्विटला उत्तर देत कंगनाने म्हटले आहे, की यासंदर्भात यामुळे चर्चा होत नाहीय, कारण हे शेतकरी नाही, तर दहशतवादी आहेत. ज्यांची भारत तोडण्याची इच्छा आहे. म्हणजे चीन सारखे देश आपल्या राष्ट्रावर कब्जा करतील आणि यूएसए सारखी चायनीज कॉलनी तयार करतील. तू शांत रहा मूर्ख. आम्ही तुझ्या सारख्ये मूर्ख नाही, की आपल्या देशाला विकू.

Big News : कंगना रणौत पुढच्या चित्रपटात होणार इंदिरा गांधी; आणीबाणी अन् ऑपरेशन ब्लूस्टारचाही असणार उल्लेख

ग्रेटा थनबर्गनेही केले समर्थन -रिहानानंतर आता स्विड‍िश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांनीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 

कंगना राणौतने भावंडांना भेट दिले चार फ्लॅट, किंमत वाचून व्हाल थक्क

सीमेवर तणावपूर्ण स्थिती -प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाले होते. त्या घटनेनंतर सरकारही आंदोलकांचा कठोरपणे सामना करण्याची तयारी करत आहे. ६ फेब्रुवारी रोजी आंदोलकांनी चक्का जामचा इशारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे अनेक पावलं उचलण्यात येत आहेत. दिल्लीतील निरनिराळ्या सीमांवर पोलिसांकडून बॅरिकेडिंग आणि रस्त्यांवर खिळेदेखील ठोकण्यात येत आहे. 

टॅग्स :कंगना राणौतशेतकरी संपदिल्लीबॉलिवूड