Join us

Delhi Violence : आंब्याच्या प्रश्नाचा संदर्भ घेत झायरा वसीमचा पंतप्रधान आणि अक्षय कुमार यांना टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 18:23 IST

दिल्लीतल्या हिंसाचारावरून झायरा वसीम हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अभिनेता अक्षय कुमार यांना टोला लगावला आहे. 

दिल्लीतल्या हिंसाचारावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला यासंदर्भातील पोस्टमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता दंगल गर्ल झायरा वसीम हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अभिनेता अक्षय  कुमार यांना टोला लगावला आहे. 

मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारनेनरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राजकीय प्रवासासोबतच मोदींचे बालपण, विरोधकांसोबतचे  नाते आणि विशेष म्हणजे त्यांना आंबे खायला आवडतात का हा प्रश्नसुद्धा त्याने विचारला होता. या प्रश्नाच्याच संदर्भावरून झायराने मोदी व अक्षय कुमारला टोला लगावला आहे.झायराने ट्विट करत म्हटलं की, तुम्ही आंबे कसे खाता याऐवजी तुम्हाला रात्री शांत झोप कशी लागते हा प्रश्न विचारायला पाहिजे होता. 

झायराने दोन सिनेमात काम केल्यानंतर बॉलिवूडला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. यामागचे कारण तिने धर्मांपासून दुरावत असल्याचे सांगितले होते. सध्या ती सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती आपलं मत व्यक्त करत असते.

टॅग्स :झायरा वसीमनरेंद्र मोदीअक्षय कुमारदिल्ली