अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि निर्माता जॅकी भगनानी यांची लव्ह लाईफ कोणापासून लपलेली नाही. हे कपल 2021 पासून एकमेकांना डेट करत आहे. बॉलिवूडमधील लव्हबर्ड्स २१ फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोन्ही घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नात देशमुख कुटुंबही सहभागी होणार आहे. देशमुख कुटुंब आणि भगनानी कुटुंब यांच्यात एक खास नातं आहे. पण, हे नातं नेमकं कसलं आहे? कारण या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांना तीन मुले आहेत. अमित, रितेश, धीरज यापैकी दाेघेजण राजकारणात सक्रीय आहेत. तर रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया हे सिनेविश्वात आहेत. भगनानी आणि देशमुख कुटुंबातत नात हे धीरज देशमुख यांच्यामुळे जोडलं गेललं आहे.
धीरज देशमुख यांनी ज्येष्ठ चित्रपट निर्माते वासू भगनानी यांची कन्या आणि अभिनेता जॅकी भगनानीच्या बहिणीशी विवाह केला आहे. धीरज यांच्या पत्नी दीपशिखा आणि जॅकी हे सख्खे भाऊ-बहिण आहेत. तर आता रकुल प्रित सिंग ही दीपशिखा देखमुखची वहिनी होणार आहे.
दीपशिखा भगनानी आणि धीरज देशमुख हे 2012 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना वंश आणि दिवियाना अशी दोन मुलं आहेत. दीपशिखाने पूजा एंटरटेनमेंट अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. दीपशिखाने 2016 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि रणदीप हुडा यांची मुख्य भूमिका असलेल्या सरबजीत चित्रपटापासून प्रोड्युसर म्हणून इनिंग सुरु केली होती. जॅकी व दीपशिखा यांच्यात खास बॉन्डिंग असल्याचं पाहायला मिळतं. दोघेही अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.