Join us

देसीगर्ल प्रियंका चोप्रा सुंदर महिलांच्या यादीत दुस-या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2017 9:07 AM

देसीगर्ल प्रियंका चोप्रा सध्या भलतीच फॉर्मात आहे.बॉलिवूडपासून हॉलीवुडपर्यंत सगळेच तिच्यावर आणि तिच्या कामावर फिदा आहेत. आता तर अख्ख बॉलिवूडच ...

देसीगर्ल प्रियंका चोप्रा सध्या भलतीच फॉर्मात आहे.बॉलिवूडपासून हॉलीवुडपर्यंत सगळेच तिच्यावर आणि तिच्या कामावर फिदा आहेत. आता तर अख्ख बॉलिवूडच वा प्रियंका वा....म्हणायचा चुकत नाहीय. कारण 2017च्या सगळ्यांत सुंदर महिलांच्या यादीत दुस-या क्रमांवर प्रियंकाने स्थान मिळवले आहे. नुकतेच बझनेटने  2017 च्या सुंदर महिलां विषयी सर्वेक्षण करण्यात आले होते. प्रियंकानेही बझनेटचे आणि  ज्यांनी ज्यांनी प्रियंकासाठी मत नोंदवली होती त्यांचे आभार मानले आहेत.   बॉलिवूड, हॉलिवूड गाजवणारी प्रियंका आता सगळ्यांत सुंदर महिला म्हणून ओळखली जाणार आहे.खुद्द प्रियंकाने सोशल मीडियावर ही बातमी शेअर करताच यांवर बॉलिवूडकरही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतायेत. पिग्गी चॉप्सच्या यशाचं तोंडभरुन कौतुक करत प्रियंकाला मिळत असलेल्या यशाला ती पात्र असल्याच्या प्रतिक्रीया तिला सोशल मीडियावर मिळतायेत. इतक्या कमी वेळात प्रियंकानं बरीच मेहनत घेत हे यश संपादन केलंय त्यामुळे पुढील वाटचालीसाठी प्रिंयकाला शुभेच्छा देण्यात येतात.तसेच सध्या सोशल मीडियावर आणखी एका कारणामुळे प्रिंयाकाची जोरदार चर्चा सुरू आहे कारण, अभिनय, पार्श्वगायन आणि निर्मातीनंतर ती आता चित्रकारही बनली आहे. होय,प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिच्या हातात पेन्टब्रश दिसतोय व्हाईट कॅनव्हॉसवर कुंचल्याच्या साहाय्याने  एक सुंदर चित्र रेखाटताना दिसते. ‘कॉन्टिको’तील प्रियांकाची को-स्टार यास्मिन अल मसरीमुळे तिला पेंटिंगची आवड निर्माण झाल्याचे प्रियंकाने सांगितले आहे.