बॉलिवूडमधले हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणला आपल्या ड्रीम वेडिंगमध्ये कोणतीच कसर सोडायची नाही आहे. आपल्या डेस्टिनेशन वेडिंगपासून ते वेडिंग ड्रेसपर्यंत सगळ्याची तयारी ते गेल्या अनेक दिवसांपासून करतायेत. 14 ते 15 नोव्हेंबरला दीपवीर इटलीमध्ये सात फेरे घेणार आहेत. सध्या बी-टाऊनमध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा होती की दीपिका लग्नात फॅशन डिझायनर सब्यसाचीने तयार केलेला ड्रेस परिधान करणार आहे. सब्यसाचीने दीपिकाचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात तिने सब्यसाचीने डिझाइन केलेली साडी परिधान केली आहे. यावरुन असा अंदाज लावण्यात येतो आहे की दीपिका सब्यसाचीच ड्रेस परिधान करेल. एका इंटरव्हु दरम्यान देखील दीपिकाला हाच प्रश्न विचारण्यात आला होता की तू लग्नात कोणी डिझाइन केलेले ड्रेससे परिधान करशील त्यावर तिने सब्यसाची हेच नाव सांगितले होते. याआधी ही दीपिकाने अनेक वेळा सब्यसाचीने परिधान केलेले आऊटफिट्स परिधान केले आहेत. याआधी सब्यसाचीने अनुष्का शर्माचा लग्नातील लेहंगा डिझाइन केला होता.
रणवीर व दीपिका संजय लीला भन्साळींच्या ‘रामलीला’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीचा जलवा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्या दोघांची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तेव्हापासून या कपलच्या लव्हलाईफची चर्चा होती. अर्थात दीपिका व रणवीर दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे त्यांच्यातील नाते मीडियासमोर मान्य केलेले नव्हते.