Join us  

सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या ? गुप्तहेर रजनी पंडित यांचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 4:48 PM

सुशांतने 14 जून 2020 रोजी वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केली. सुशांतने 14 जून 2020 रोजी वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अनेकांनी ती आत्महत्या नसून हत्याचं असल्याचं म्हटलं. सुशांत आत्महत्याप्रकरणी आजही अनेक अशा गोष्टी समोर येत आहेत, ज्या थक्क करणाऱ्या आहेत. यातच आता गुप्तहेर रजनी पंडीत यांनी आणखी एक खुलासा केलाय.

भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या रजनी पंडीत यांनी नुकतेच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर भाष्य केलं. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अनेक थेअरी आहेत. कुणी आत्महत्या तरी कुणी हत्या केली असे म्हणतं. तुम्ही याबद्दल काही वाचलं आहे किंवा स्व:ता हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला का ? असा प्रश्न त्यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर रजनी पंडती यांनी सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्यांची शंका व्यक्त केली. 

त्या म्हणाल्या, "जरा पाहायला गेलं ना, तर आपले पोलिस हे फार हुशार आहेत. ते माहिती बाहेर काढू शकतात. पण, वरतून काय प्रेशर असतं हे माहिती नाही.   आत्महत्या आहे की हत्या आहे, हे समजण्यासाठी खूप सोप आहे. मला वाटतं की सुशांतला आत्महत्या करण्यासाठी मानसिकरित्या प्रवृत्त करण्यात आलं. तु आत्महत्या कर नाहीतर आम्ही मारू, असे त्याला सांगण्यात आलं असावं, असं मला वाटतं". 

तुम्हाला हे कोणी अधिकाऱ्याने सांगितलं आहे का, या प्रश्वावर त्या म्हणाल्या, "असं मी नाव नाही घेऊ शकत. पण, आमच्याकडे मोठे-मोठे अधिकार येतात. त्यांना नेमका कुणाचा सहभाग आहे, काय झालं या सर्व आतल्या गोष्टी माहिती असतात. तेव्हा चर्चा होतात, तर समजतं. तसेच आम्हालाही कळतं नेमकं काय सुरू आहे".

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूड