साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत राज कपूर, दिलीप कुमार व देव आनंद यांची चलती होती. एकीकडे दिलीप कुमार सीरियस भूमिका साकारणारे ट्रॅजेडी किंग होते तर राज कपूर खूपच चंचल भूमिका करत होते. मात्र रोमांस, स्टाईल व मनाला भिडणाऱ्या भूमिका फक्त देव आनंद यांनाच मिळायच्या. देव आनंद यांचे आजदेखील लाखो दीवाने आहेत.
२६ सप्टेंबर, १९२३ रोजी देव आनंद यांचा जन्म झाला होता. देव आनंद यांचं खरं नाव धर्मदेव पिशोरिमल आनंद आहे. पण, त्यांना सगळे देव आनंद या नावानेच ओळखलं जातं होतं. त्याचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. देव आनंद यांच्या घरातले चीरू असं संबोधयाचे.
देव आनंद यांची प्रेमकथा अर्धवट राहिली. त्यांचं पहिलं प्रेम सुरैया होती. विद्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरैया पाण्यात डुबत होती आणि देव आनंद यांनी त्यांच्या जीवाची पर्वा न करता तिला वाचवलं होतं. तिथूनच त्यांच्या प्रेमकथेला सुरूवात झाली होती.