साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद यांचाच बोलबाला होता. एकीकडे दिलीप कुमार सीरियस भूमिका साकारणारे ट्रॅजेडी किंग होते तर राज कपूर खूपच चंचल भूमिका करत होते. मात्र रोमांस, स्टाईल व मनाला भिडणाऱ्या भूमिका फक्त देव आनंद यांनाच मिळायच्या. देव आनंद (Dev Anand) यांचे आजदेखील लाखो दीवाने आहेत.
२६ सप्टेंबर, १९२३ रोजी देव आनंद यांचा जन्म झाला होता. देव आनंद यांचं खरं नाव धर्मदेव पिशोरिमल आनंद आहे. पण, त्यांना सगळे देव आनंद या नावानेच ओळखत होते. त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. देव आनंद यांना पाहण्यासाठी लोक तासनतास रांगेत उभे होते. जिथे लाखो मुली त्यांच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या. अभिनेत्याचा स्वभावही खूप रोमँटिक होता. त्यामुळेच त्यांच्या प्रेमाच्या चर्चा आजही ऐकायला मिळतात.
देव आनंद कल्पना कार्तिक यांच्या प्रेमात पडले
अभिनेत्याच्या अफेअर्सबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लग्नाबद्दल सांगणार आहोत. आधी देव हे अभिनेत्री सुरैयाच्या प्रेमात वेडे होते पण नंतर जेव्हा दोघांचे लग्न होऊ शकले नाही तेव्हा हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर ते अभिनेत्री कल्पनाच्या जवळ आले. चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असताना देव आनंद कल्पना कार्तिक यांच्या प्रेमात पडले. कल्पना एक प्रसिद्ध अभिनेत्री तर होत्याच पण त्या वेळी त्यांनी मिस शिमला हा किताबही जिंकला होता.
लंच ब्रेकमध्ये कोर्ट मॅरेज केले
दोघेही एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्यांच्यातील जवळीकही वाढू लागली. त्यानंतर १९५४ मध्ये रिलीज झालेल्या 'टॅक्सी ड्रायव्हर' चित्रपटादरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न करण्याची वाट पाहिली नाही आणि शूटिंगदरम्यान लंच ब्रेकमध्ये कोर्टात जाऊन लग्न केले.