Join us

'देवा' सिनेमाच्या कमाईत वाढ, शाहिद कपूरच्या अभिनयाला मिळतेय पंसती! दोन दिवसात कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 12:25 IST

'देवा' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. यामध्ये सिनेमाच्या कमाईत वाढ झालेली दिसतेय (deva, shahid kapoor)

'देवा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. सिनेमाचा टीझर, ट्रेलर आणि गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांना आवडल्या. 'देवा' सिनेमाच्या रिलीजची सर्वजण वाट पाहत होते. शाहिद कपूरची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज झाला. सिनेमाच्या ओपनिंग डेला 'देवा'ला संमीश्र प्रतिसाद मिळाला. परंतु काल शनिवारी 'देवा'च्या कमाईत चांगलीच वाढ झालेली दिसली. पाहूया 'देवा'च्या कमाईचे आकडे.'देवा' सिनेमाने दोन दिवसात कमावले इतके कोटी?

'देवा' सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त ५ कोटी ५० लाखांची कमाई केली. सिनेमाच्या बजेटनुसार ही कमाई खूप कमी होती. परंतु दुसऱ्या दिवशी मात्र 'देवा' सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असून सिनेमाने ६ कोटी २५ लाखांची कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांमध्ये सिनेमाने ११ कोटी ७५ लाख कमावले आहेत. एकूणच माउथ पब्लिसिटीच्या जोरावर 'देवा'च्या कमाईत चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतेय.

'देवा' सिनेमाविषयी

रोशन एंड्र्यूज यांनी 'देवा' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात शाहिदची आजवरची सर्वात वेगळी आणि भन्नाट भूमिका आहे. एकंदरीत व्यवस्थेला न जुमानणारा पोलीस अधिकारी आपल्या मर्जीचा मालक, अशी त्याची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. सिनेमात शाहिद कपूरसोबत पावेल गुलाटी, पूजा हेगडे, कुब्रा सय्यत, उपेंद्र लिमये हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 

 

टॅग्स :शाहिद कपूरपूजा हेगडेबॉलिवूड