Dhadak First Song : ‘धडक’चे टायटल सॉन्ग लावेल ‘याड’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 7:33 AM
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिचा पहिला बॉलिवूड सिनेमा ‘धडक’चे पहिले गाणे ‘धडक है ना...’ रिलीज झालेय.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिचा पहिला बॉलिवूड सिनेमा ‘धडक’चे पहिले गाणे ‘धडक है ना...’ रिलीज झालेय. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरने आपल्या चाहत्यांसोबत जयपूरमध्ये हे गाणे रिलीज केले. जान्हवी आणि ईशान या दोघांवर चित्रीत हे गाणे श्रेया घोषाल आणि अजय गोगवले यांनी गायले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी या गीताचे बोल लिहिले आहेत. गाण्यात ईशान व जान्हवी दोघांचाही रोमान्स वेड लावणारा आहे, तितकेच गाणेही मनात रूंजी घालणारे आहे. श्रेया आणि अजय गोगवले यांच्या आवाजाने गाण्याला सुंदर साज चढवला आहे. ‘धडक’ एक शानदार प्रेमकथा आहे. मराठी चित्रपट ‘सैराट’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. ‘सैराट’लाही याच जोडीने संगीत दिले होते. ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर या ‘सैराट’ने सिने रसिकांना अक्षरशा: याड लावले होते. सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या. त्यामुळे तिकीट खिडकीवरही ‘सैराट’ने सगळे रेकॉर्ड मोडले होते. हे पाहून करण जोहर यांनी अजय-अतुलला ‘धडक’साठी खास निमंत्रित केले होते. त्यांनीच ‘धडक’ला संगीत द्यावे, हा करणचा आग्रह होता.ALSO READ : पाहा, जान्हवी कपूरच्या रूपातील ‘आर्ची’ आणि ईशान खट्टरच्या रूपातील ‘परश्या’, ‘धडक’चा ट्रेलर रिलीज!!काही दिवसांपूर्वीचं ‘धडक’चा ट्रेलर रिलीज झाला होता. १० जूनला रिलीज झालेला हा ट्रेलर आत्तापर्यंत ५० लाखांवर लोकांनी पाहिला आहे. ‘धडक’ हा ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे, पण निश्चितपणे ‘सैराट’पेक्षा ‘धडक’चा बाज वेगळा आहे, हे ट्रेलर पाहून जाणवते.चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी व ईशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत. ट्रेलरमधील जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. चित्रपटातील अनेक सीन्स ‘सैराट’ची आठवण करून देतात.