निर्माता करण जोहर दिग्दर्शक शशांक खेतान यांचा 'धडक' सिनेमा थिएटर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिचा हा डेब्यू सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाच्या रिलीजची अनेकजण प्रतीक्षा करत होते. अखेर ती प्रतीक्षा आज संपली आहे. धडकने थिएटरमध्ये येऊन 'धडक' दिली आहे. प्रेक्षकांना जान्हवीचा अभिनय पसंतीस उतरतोय. ज्यादिवशी जान्हवीच्या डेब्यूची घोषणा झाली होती त्यादिवसापासून जान्हवी चर्चेत होती.
'धडक' सिनेमाचे बजेट 70 कोटींचे होते त्यातले 50 कोटी सिनेमा तयार करणाऱ्यावर खर्च करण्यात आले तर उरलेले 20 कोटी सिनेमाच्या प्रमोशन आणि ब्राँडिंगवर. जान्हवीला आपल्या पहिल्या सिनेमासाठी कित्ती मानधन मिळाले हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेल. जान्हवीला तिच्या पहिल्या सिनेमासाठी 30 लाखांचे मानधन मिळाले तर ईशान खट्टरला सुद्धा जान्हवी ऐवढेच मानधन देण्यात आले. या सिनेमात व्हिलन साकारलेले आशुतोष राणा यांना 50 लाख मानधन देण्यात आलं आहे. तेच या सिनेमासाठी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी झिंगाट गाणं रिक्रिएट केलं आहे. दोघांना 1.5 कोटी रुपयांचं मानधन देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नागराज मंजुळे यांची ही कथा असून त्यासाठी त्यांना 2 कोटी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. तर दिग्दर्शक शशांक खेतान याने या सिनेमासाठी 4 कोटी रुपये मानधन घेतल्याचे बोलले जात आहे.
‘धडक’ एक शानदार प्रेमकथा आहे. मराठी चित्रपट ‘सैराट’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. ‘सैराट’लाही याच जोडीने संगीत दिले होते. ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर या ‘सैराट’ने सिने रसिकांना अक्षरशा: याड लावले होते. चित्रपट राजस्थानी पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात जान्हवी व ईशान खट्टर दोघेही राजस्थानी टोनमध्ये बोलताना दिसताहेत.