Join us

Urvashi Rautela Dhanashree Verma: धनश्री T20 World Cup साठी पोहोचली ऑस्ट्रेलियात, पोस्टमधून उर्वशी रौतेलाला केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 9:25 PM

धनश्री वर्माच्या फोटोंची कायमच होते चर्चा

Urvashi Rautela Dhanashree Verma: सध्या भारतीय क्रिकेट संघ T20 World Cup 2022 साठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे टीम इंडिया २३ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे. पण या स्पर्धेची आणि या हाय-व्होल्टेज सामन्याची जितकी चर्चा होतेय, त्यापेा जास्त चर्चा सामने पाहण्यासाठी येणार्‍या सेलिब्रिटी आणि खेळाडूंच्या पार्टनर्सची होताना दिसतेय. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा टी२० वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे. तिने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याबद्दल सांगितले आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, याच पोस्टमधून तिने उर्वशी रौतेलाची खिल्ली उडवल्याचेही बोलले जात आहे.

धनश्रीने खरंच उर्वशीची खिल्ली उडवली का?

लेगस्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने उर्वशीला ट्रोल केल्याचे तिच्या एका पोस्टमधून दिसतेय. उर्वशीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले होते की ती ऑस्ट्रेलियाला पोहोचली. यावेळी पोस्टमध्ये ती त्याच स्टाईलमध्ये बसलेली दिसली ज्या स्टाईलमध्ये धनश्री बसली होती. तिने तशाच पद्धतीचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये उर्वशीने जे लिहिले होते तेच लिहिले. अशा वेळी, परिस्थितीत चाहत्यांनी जे काही ओळखायचं ते नीट ओळखलं. तिचा हा फोटो आणि तिची पोस्ट दोन्ही गोष्टी झटपट व्हायरल झाल्या. त्यानंतर चाहत्यांनीही उर्वशीला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही.

--

----

उर्वशीच्या Video पासून सुरू झाली होती चर्चा

गेल्या काही महिन्यांपासून रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला या दोन नावांची सतत चर्चेत आहे. याची सुरुवात उर्वशीच्या व्हायरल मुलाखतीने झाली. त्या मुलाखतीमध्ये तिने आरपी शब्दाचा उल्लेख केला होता. त्यानंतर तिने नाव न लिहिता ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. यासोबतच ती आशिया कपमधील मॅच पाहण्यासाठी यूएईला पोहोचली होती. तसेच, टी२० वर्ल्डकप साठी संघ रवाना झाल्यानंतरही ती तेथे पोहोचली आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगली आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डउर्वशी रौतेलारिषभ पंतइन्स्टाग्राम