Join us

सुपरस्टार धनुषला अभिनेता व्हायचं नव्हतं, पण 'या कारणाने बदलला विचार आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 13:35 IST

Dhanush : अनेकांना माहीत नाही की, सिनेमात काम करणं हा त्याचा पहिला पर्याय नव्हता. त्याचं स्वप्न वेगळंच होतं. पण त्याने त्याच्या वडिलांमुळे सिने विश्वात पाउल ठेवलं.

साऊथचा सुपरस्टार धनुषचं (Dhanush) खरं नाव वेंकटेश प्रभु कस्तुरी राजा असं आहे. त्याचे वडील कस्तुरी राजा सिने निर्माता आहेत. तर त्याचा भाऊ सेल्वराघवन हा सुद्धा सिने निर्माता आहे. अनेकांना माहीत नाही की, सिनेमात काम करणं हा त्याचा पहिला पर्याय नव्हता. त्याचं स्वप्न वेगळंच होतं. पण त्याने त्याच्या वडिलांमुळे सिने विश्वात पाउल ठेवलं. सध्या तो साऊथच्या सुपरस्टार्सपैकी एक आहे आणि त्याची फॅन फॉलोईंग जगभरात आहे.

काय व्हायचं होतं धनुषला?

धनुषला अभिनेता नाही तर मरीन इंजिनिअर व्हायचं होतं. पण त्याच्या वडिलांनी त्याच्या सिनेमात अभिनय करण्यावर जोर दिला आणि धनुष मरीन इंजिनिअरच्या जागी अभिनेता झाला. धनुष अभिनेता असण्यासोबतच साऊथचा सुपर स्टार रजनीकांतचा जावई आहे. त्याने रजनीकांतची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केलं. धनुष आणि ऐश्वर्याला दोन मुलं आहेत. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात 'तुलुवडो इल्लमई' सिनेमातून केली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन धनुषने केलं होतं. हा सिनेमा २००२ मध्ये रिलीज झाला होता.

या सिनेमात धनुषने पहिल्यांदाच कॅमेराचा सामना केला होता. त्यानंतर त्याने अडुकलम सिनेमात काम केलं होतं आणि या सिनेमातून त्याला चांगली ओळख मिळाली. या सिनेमासाठी त्याला बेस्ट अॅक्टरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण धनुष जेव्हा १६-१७ वर्षांचा होता तेव्हा त्याला मरीन इंजिनिअर व्हायचं होतं. कधी कधी त्याच्या मनात शेफ बनण्याचाही विचार येत होता. पण वडिलांनी मरीन इंजिनिअर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या मुला हिरो केलं. 

टॅग्स :धनुषTollywoodबॉलिवूड