अभिनेता सनी देओलचा 'जाट' सिनेमा आज रिलीज झाला आहे. रिलीजच्या आदल्या रात्री सिनेमाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली. या स्क्रीनिंगला अनेक तारे तारकांनी हजेरी लावली. याचवेळी धर्मेंद्र यांनी चक्क भांगडा करत आनंद व्यक्त केला. लेकाच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगमध्ये त्यांनी मस्त माहोल बनवला. याही वयात धर्मेंद्र (Dharmendra) यांचा दांडगा उत्साह पाहून सगळेच चकित झाले.
'जाट' फुनऑन अॅक्शनपट सिनेमा आहे. धांसू डायलॉग, सनीचे अॅक्शन सीन्स, रणदीप हुडासोबत टक्कर, 'छावा' फेम विनीत कुमारचा अभिनय असा एकूणच मसालापट आहे. साऊथ स्टाईल अॅक्शन यामध्ये पाहायला मिळणार आहे. स्क्रीनिंगला धर्मेंद्र यांच्या हजेरीने लक्ष वेधून घेतलं. रेड कार्पेंटवर ते आले आणि सिनेमाच्या म्युझिकवर जागीच उभे राहून मस्त भांगडा केला. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद होता. आपल्या मुलाच्या सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी ते तिथे आले होते. धर्मेंद्र यांचा डान्स म्हणजे १०० टक्के आनंद अशीच तिथल्या लोकांनी प्रतिक्रिया दिली.
धर्मेंद्र यांच्या उत्साहाची, एनर्जीचे सगळेच स्तुती करत आहेत. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. धर्मेंद्र यांनी २०२३ साली आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात काम केलं. तर 'गदर २'च्या यशानंतर सनी देओलचा भावही वाढला आहे. 'जाट'नंतर तो 'बॉर्डर २', 'लाहोर १९४७' या सिनेमांमध्येही दिसणार आहे.