Join us

लग्न मंडपात जाण्यापूर्वी सनी देओल यांच्या सूनची झाली होती अशी अवस्था, मेकअप रुममधील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 13:27 IST

करण आणि द्रिशाचा लग्नसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडला.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू करण देओलचं लग्न होऊन दोन आठवड्यांहून अधिक दिवस झाले आहेत. मनालीला कौटुंबिक सहलीनंतर दोघेही त्यांच्या हनीमूनसाठी रवाना झाले आहेत. सध्या करण आणि द्रिशा आर्चाय  केनियाच्या जंगलात एकमेकांना क्वॉलिटी टाईम स्पेंट करतायेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोयेत. या फोटोंदरम्यान द्रिषा आचार्याचा मंडपात जाण्यापूर्वीचा एका फोटो चांगलाच व्हायरल आहे.

कोणत्याही मुलीसाठी तिच्या लग्नाचा दिवस हा आयुष्यातील खूप मोठा असतो. कुटुंब कितीही ओळखीचे असले तरी मनात थोडी भीती आणि आनंद दोनही असतोच. द्रिशा आचार्यचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लग्नासाठी तयार होताना दिसत आहे.

लग्नासाठी तयार झाल्यानंतर, लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. स्टायलिस्ट तिला तयार करत आहे,  यादरम्यान ती डान्स करताना दिसत आहे. ती तिच्या लग्नासाठी खूप उत्सुक दिसत आहे. स्वतःला आरशात पाहून ती खुश आहे. करण आणि द्रिशाचा लग्नसोहळा मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडलाय या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकरांनी हजेरी लावली होती. 

द्रिशा आणि करण गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. द्रिशा ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी निगडीत आहे आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. करण देओल हा सनी देओल आणि पूजा देओल यांचा मुलगा आहे. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो यमला पगला दीवाना 2, पल पल दिल के पास यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. बॉलिवूडमध्ये तो अद्याप एकही हिट चित्रपट देऊ शकला नाही.

टॅग्स :करण देओल