Join us  

सनी, ईशा अन् बॉबी यांना एकत्र पाहून भारावले धरम पाजी, सोशल मीडियावर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:30 PM

सनी देओल आणि बॉबी देओल यांची सावत्र बहीण ईशा देओलने 'गदर 2'चं स्पेशन स्क्रीनिंग ठेवलं होतं.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) सध्या धुमाकूळ घालतोय. २२ वर्षांपूर्वी आलेल्या ब्लॉकबस्टर 'गदर' चा हा सिक्वल आहे. गदर फक्त सिनेमा नाही तर इमोशन आहे म्हणत चाहते कौतुक करत आहेत. 'गदर 2'मध्येही सनी देओलने आपली ताकद दाखवत पाकिस्तानला जागा दाखवून दिली आहे. तारासिंग आणि सकीना यांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओल आणि बॉबी देओल यांची सावत्र बहीण ईशा देओल (Esha Deol) पहिल्यांदाच दोन्ही भावांसोबत काल दिसली. तिने 'गदर 2'चं स्पेशन स्क्रीनिंग ठेवलं होतं. या भावाबहिणींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. वडील धर्मेंद्र (Dharmendra) यांनी हे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर स्टोरी मध्ये पोस्ट केले आहेत.

सनी देओलचा मुलगा करण देओल नुकताच विवाहबंधनात अडकला. त्याच्या लग्नात हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली गैरहजर होत्या. त्यामुळे इतक्या वर्षांनंतरही धर्मेंद्र यांचं दोन्ही कुटुंब एकमेकांशी बोलत नाही हे पुन्हा समोर आलं. मात्र या चर्चांवर पूर्णविराम देत ईशा देओलने पहिलं पाऊल टाकलं. तिने करण देओलला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तर आता सनी देओलसाठी 'गदर 2' चं स्क्रीनिंगही ठेवलं. यावेळी सनी, बॉबी आणि ईशा यांनी कॅमेऱ्यासमोर माध्यमांना पोज दिली. हेमा मालिनी मात्र यावेळी गैरहजर दिसल्या. तर धर्मेंद्र यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या मुलांचा हा व्हिडिओ ठेवला. मात्र त्याला काहीच कॅप्शन दिलं नाही. 

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्याआधी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबासोबत हेमा मालिनींचा कधीच संबंध येणार नाही अशी ती अट होती. म्हणून त्यांची दोन्ही कुटुंब कधीच सोबत आले नाहीत. आता इतक्या वर्षांनी ईशा देओलने पुढाकार घेत दोन्ही कुटुंबातला दुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :इशा देओलधमेंद्रसनी देओलबॉबी देओल