Join us

'बहुत मजा आया...', शबाना आजमींसोबतच्या किसींग सीनवर अभिनेते धर्मेंद्र यांनी असं केलं रिअ‍ॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:53 IST

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातील शबाना आजमी आणि धर्मेंद्र यांचा किसींग सीन जास्त चर्चेत आहे.

करण जोहरचा (Karan Johar) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला जमावला आहे. करण ७ वर्षांनंतर सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमातील स्टारकास्टही तेवढीच तगडी आहे. आलिया भट (Alia Bhat) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या मुख्य भूमिका आहेत. सोबतच बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकारही यामध्ये भाव खाऊन जात आहेत. हँडसम अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना आजमी यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. इतकंच नाही तर शबाना आजमी (Shabana Azmi) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांचा एक किसींग सीनही आहे.

धर्मेंद्र यांना सध्या चर्चेत असलेल्या त्यांच्या किसींग सीनविषयी जेव्हा विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, "मला लोक किसींग सीनबाबत मेसेज करत आहेत. मी म्हणलं 'ये तो मेरे बाएँ हात का खेल है'."  

पुढे ते म्हणाले,  बहुत मजा आया. त्याचं ही प्रतिक्रिया पाहून मीडियामध्ये एकच हशा पिकला. यावर ते स्पष्टीकरण देत म्हणाले, मी सिनेमाबाबत बोलतोय. किसिंग सीनबद्दल करण जोहरकडे इशारा देत धर्मेंद्र म्हणाले - जर कर्णधार चांगला असेल तर संघ चांगला खेळतो. ही कथा ऐकल्यावर मला वाटले की ही प्रत्येक घरातील गोष्ट आहे. ही एक चांगली कथा आहे आणि जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी सिक्स मारतो. 

 ७० च्या काळातले ते सर्वात हँडसम अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री आतुर असायच्या. नुकतंच शबाना आजमी यांनीही किसींग सीनवर प्रतिक्रिया दिली होती. धर्मेंद्र यांना किस करण्याची कोणाची इच्छा नाही होणार असं त्या म्हणाल्या होत्या. 

 

टॅग्स :धमेंद्रशबाना आझमीकरण जोहर