Join us

"ये तो मेरे बाएँ..." शबाना आजमींसोबतच्या किसींग सीनवर हँडमस अभिनेते धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:52 IST

मला लोक किसींग सीनबाबत मेसेज करत आहेत. मी म्हणलं...

करण जोहरचा (Karan Johar) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सध्या तुफान गाजतोय. पुन्हा एकदा 'कुछ कुछ होता है' चा काळ परत आल्याचं म्हणत करण जोहरचं कौतुक केलं जातंय. सिनेमात रणवीर सिंगच्या अभिनयाने लक्ष वेधलंय. त्याने साकारलेल्या दिल्लीच्या मुलाची भूमिका प्रेक्षकांना भलतीच आवडली आहे. तर आलिया भटचे लुक्स खूप पसंत केले जात आहेत. सिनेमात एक आकर्षक गोष्ट म्हणजे धर्मेंद्र (Dharmendra)आणि शबाना आजमी (Shabana Azmi) यांची लव्हस्टोरी. त्यांचा एक किसींग सीनही दाखवण्यात आला आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ने एकाच आठवड्यात ७० कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमाच्या यशानिमित्त संपूर्ण स्टारकास्टने मीडियाशी संवाद साधला. यावेळी अभिनेते धर्मेंद्र यांच्या हजेरीने चार चाँद लावले. धर्मेंद्र यांना सध्या चर्चेत असलेल्या त्यांच्या किसींग सीनविषयी जेव्हा विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, "मला लोक किसींग सीनबाबत मेसेज करत आहेत. मी म्हणलं 'ये तो मेरे बाएँ हात का खेल है'."  फिल्मफेअर आणि व्हिरल भयानी यांनी या 'मीडिया मीट'चे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

धर्मेंद्र यांच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचा चार्म अजूनही कायम आहे. ७० च्या काळातले ते सर्वात हँडसम अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक अभिनेत्री आतुर असायच्या. नुकतंच शबाना आजमी यांनीही किसींग सीनवर प्रतिक्रिया दिली होती. धर्मेंद्र यांना किस करण्याची कोणाची इच्छा नाही होणार असं त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :धमेंद्रशबाना आझमीकरण जोहरबॉलिवूड