धोनीच्या निर्णयामुळे शाहरूख झाला नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2017 06:07 PM2017-01-14T18:07:47+5:302017-01-14T18:07:47+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्याने क्रिकेट जगतामध्ये एकच खळबळ ...
भ रतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्याने क्रिकेट जगतामध्ये एकच खळबळ उडाली होती. धोनीच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले, तर काहींनी धोनीचे गोडवे गात नव्या दमाच्या क्रिकेटरला तो संधी देत असल्याचे म्हटले. मात्र त्याचा हा निर्णय किंग खान याला अजिबात आवडला नसल्याने नाराजी व्यक्त केली.
त्याचे झाले असे की, ट्विटरवर शाहरूखच्या एका फॅनने धोनीने कर्णधारपद सोडल्याच्या निर्णयावर त्याला प्रतिक्रिया विचारली. फॅनच्या ट्विटला रिट्विट करताना शाहरूखने म्हटले की, सगळ्याप्रमाणेच मीही धोनीचा फॅन आहे. जोपर्यंत तो मैदानात आहे, तोपर्यंत मी आनंदी आहे. मात्र त्याचा हा निर्णय खूपच निराशाजनक आहे.
शाहरूख आणि क्रिकेटचे नाते कधीच लपून राहिले नाही. आयपीएलमध्ये त्याचा ‘कोलकाता नाइट रायडर’ संघ असून, टीमचे मनोबल वाढविण्यासाठी तो नेहमीच मैदानात उतरत असतो. याच कारणामुळे शाहरूखची टीम तब्बल दोनवेळा आयपीएल चॅम्पियन राहिली आहे. त्याचबरोबर त्याने बºयाचदा एम. एस. धोनीचे कौतुक करताना तो सर्वोत्तम खेळाडू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच धोनीचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय त्याला कदाचित आवडला नसावा.

I love him like we all do. As long as he is playing will be happy. https://t.co/NhO519Zmtk— Shah Rukh Khan (@iamsrk) January 12, 2017 ">http://
}}}}I love him like we all do. As long as he is playing will be happy. https://t.co/NhO519Zmtk— Shah Rukh Khan (@iamsrk) January 12, 2017