अभिनेत्री दिया मिर्झा कोणत्याना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दियाने 2000 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब मिळवला. त्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली. मिस एशिया पॅसिफिक बनल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.रहेना है तेरे दिल में मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज आम्ही तुम्हाला दियाच्या पर्सनल लाईफबाबत काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला माहिती नसतील. दियाने दियाचे 2014 मध्ये साहिल संघासोबत लग्न केले होते. मात्र हे लग्न फारकाळ टिकले नाही. दिया आणि साहिल दोघे ही फिल्म इंडस्ट्रीतून आहेत. दोघांची पहिली ओळख 2009 मध्ये झाली होती ज्यावेळी एका सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन साहिल दियाच्या घरी गेला होता. त्या छोट्याशा भेटीत साहिलला पाहून दियाच्या मनाची तार छेडली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. ब्रुकलेन ब्रिजवर साहिलने दियाला प्रपोज केले होते.
बॉलिवूड सिनेमाप्रमाणे रोमाँटिक आहे दिया मिर्झा आणि साहिलची लव्हस्टोरी, मात्र तरीही झाले विभक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 20:00 IST