दीया मिर्झा आणि साहिल सांगा अनेक वर्ष नात्यामध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेतला. या दोघांनी घटस्फोच घेतल्याचे कोणाला विश्वासच बसत नव्हता. सा-यांनाचा या बातमीने धक्काच बसला होता. घटस्फोट घेतल्यानंतर दीया मिर्झाचे संपूर्ण आयुष्यच पालटले आहे. मात्र असे नेमक काय घडले असावे सगळं काही सुरळीत सुरू असताना दीया मिर्झाने घटस्फोट घेतला? या प्रश्नाने आजही अनेकांना भेडसावून सोडले आहे. साहिल सांगासोबत तलाक झाल्यानंतर या कठीण काळात स्वत:ला कसं सावरलं आणि त्यांच्यातलं नातं कसं होतं याबद्दल नुकताच दीयाने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.
जगासमोर हे एक प्रेमळ नाते दिसत होते. इतकेच नाही तर आमचे नाते जसे घट्ट असायला हवे होते तिकते नव्हते. त्यातून होणारा त्रास मला जगासमोरही आणायचा नव्हता त्यामुळे त्या वेदनेला लपवण्यासाठी कायमच चेहऱ्यावर हसू असायचं. हो, कदाचित ही माझी जगण्याची कौशल्ये आहेत. जी मी आयुष्यातील अनुभवांमधून शिकले. माझ्याकडे वैयक्तिक वेदनेचा सामना करण्याचे स्वत: चे मार्ग आहेत.
नेहमीच आपले खाजगी आयुष्य आपल्यापुरतेच मर्यादित ठेवणारी दीया तिच्या या नात्याबद्दल विविध व्यासपिठावर बोलत असते. यातून या घटस्फोटातून आता ती सावरत असल्याचेही वेळोवेळी पाहायला मिळते.