Join us

मालदीवमध्ये पतीसोबत हनीमून एन्जॉय करतेय दिया मिर्झा, महिनाभरापूर्वी वैभव रेखीसोबत घेतले सात फेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 15:26 IST

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने बिझनेसमन वैभव रेखीशी दुसरं लग्न केले.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने 15 फेब्रुवारीला बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केले. लग्नानंतर दीया आणि वैभव आता हनीमूनला मालदीवमध्ये गेले आहेत. मालदीवहुन दीयाने तिची काही सुंदर फोटो पोस्ट केली आहेत जे तिचा नवरा वैभव रेखीने काढले आहेत. दीयाच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत  

दीयाने तिचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यात ती मालदीवमध्ये बीचवर ग्रीन रंगांची  बिकिनी घालून पोझ देताना दिसतेय. .दीयाच्या या फोटोवर चाहते लव्ह इमोजीसह जोरदार कमेंट्स करतायेत. 

दीयाचे हे दुसरे लग्न आहे. तिचा दुसरा पती वैभव याचेही हे दुसरे लग्न आहे. वैभवशी लग्न करण्यासाठी दीयाने 2019 मध्ये साहिल संघाला घटस्फोट दिला होता. दीया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये साहिल सिंघाशी लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळा काही टिकले नाही. साहिलला 2019 मध्ये घटस्फोट घेत ती वेगळी झाली होती.

दियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी रहना है तेरे दिल में मधील तिची भूमिका प्रेक्षकांना अधिक भावते. दियाच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्याची अधिक चर्चा रंगते.

टॅग्स :दीया मिर्झा