'कॉकटेल', 'हॅप्पी भाग जायेगी' सिनेमात मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री डायना पेंटी काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'परमाणु' चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहमसोबत प्रमुख भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिने साकारलेली अंबालिकाची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. त्यानंतर आता तिचा 'हॅप्पी भाग जायेगी रिटर्न्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डायना अभिनयाव्यतिरिक्त आणखीन एक काम करत आहे. कोणते काम करते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल ना. डायनाने मिनी पाठशाला सुरू केली आहे. ही मिनी पाठशाला तिने सोशल मीडियावर सुरू केलेली असून त्यात ती सामान्य इंग्रजी शब्दांचे अर्थ हिंदीत सांगणार आहे.
याबाबत डायना पेंटीने सांगितले की, 'मी त्याला मिनी पाठशाला यासाठी म्हणते आहे कारण माझ्याकडे शिकवण्यासाठी छोटासा फळा आहे. या फळ्यावर ती ब्लूबैरीचा अर्थ सांगत आहे. हिंदीत ब्लूबेरीला नीलबदरी म्हटले जाते.' या व्हिडिओसह डायनाने कॅप्शनमध्ये हिंदीत लिहिले आहे की, "देवियों और सज्जनो, आपका स्वागत हैं 'मिनी पाठशाला' में."
डायनाने ही हिंदी मिनी पाठशाळा सुरू करण्यामागे काय उद्देश आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र लवकरच त्याचे कारणदेखील स्पष्ट होईल. डायना पेंटी 'हॅप्पी भाग जायेगी रिटर्न्स' सिनेमाव्यतिरिक्त निखील आडवाणीच्या 'लखनौ सेंट्रल' चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत फरहान अख्तर हा असणार आहे.याबाबत बोलताना डायना म्हणाली, 'या चित्रपटात काम करण्याविषयी मी खूपच उत्सुक आहे. मला अशा पद्धतीच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. लखनौ सेंट्रल अशाच पद्धतीचा चित्रपट आहे, असे मला वाटते. निखीलने ज्यावेळी मला या चित्रपटाविषयी विचारले, त्यावेळी मी त्याला नकार देऊ शकले नाही.'