बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वाढदिवसाआधी आमिर खानने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडचा खुलासा केला. तो गौरी स्प्रेटला दीड वर्षांपासून डेट करत असल्याचे सांगितले. आमिर खान वयाच्या ६०व्या वर्षी डेट करत असल्याची बातमी ऐकून चाहत्यांना धक्काच बसला. तसेच, ही बातमी ऐकून आमिर खानच्या मुलीलाही धक्का बसल्याचे बोलले जात आहे. अलिकडेच आमिर खानची मुलगी आयरा (Ira Khan) त्याच्यासोबत स्पॉट झाली. यावेळी तिच्या चेहऱ्याकडे बघून नेटिझन्सना वाटत आहे की कदाचित आयरालाही अभिनेता डेट करतो आहे, हे पटले नाही.
आमिर खानची मुलगी आयरा खान नुकतीच वडिलांचे घर सोडताना भावूक झाली होती. ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये आमिर आपल्या मुलीला मिठी मारताना आणि नंतर तिला कारमध्ये बसवताना दिसत आहे, तर, कारमध्ये बसल्यानंतर, आयरा तिच्या डोळ्यात अश्रू येऊ न देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यादरम्यान पापाराझींनी हा खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद केला.
यावेळी आयराच्या चेहऱ्यावर तणाव आणि डोळ्यात अश्रू दिसत होते. हा व्हिडीओ पाहून यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कोणी म्हणते की, कदाचित आयरा या गोष्टीवर नाराज आहे की तिचे वडील ६० व्या वर्षी तिच्याशी तिसरे लग्न करू शकतात, तर दुसऱ्या यूजरने लिहिले - कधीकधी मुलांना त्यांच्या पालकांच्या आनंदामुळे प्रवास करावा लागतो. काही युजर्सनी तिला एकटीला सोडा. ती सेलिब्रेटी असली तरी माणूस आहे हे विसरू नका. तिची प्रायव्हसीचा आदर ठेवा अशा कमेंट्स केल्या आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी आयराचे समर्थन केले आहे. पण ती भावुक का झाली यामागचं कारण समजू शकलेलं नाही.
मानसिक आरोग्यावर अनेकदा बोललीय आयरा
आयराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने फिटनेस कोच नुपूर शिखरेसोबत लग्न केले आहे. याआधीही तिने तिच्या मानसिक आरोग्याच्या आव्हानांबद्दल सांगितले आहे. तिचा प्रामाणिकपणा पाहून काही चाहत्यांनी तिच्या तब्येतीची चिंता व्यक्त केली आणि तिला प्रायव्हसी आणि पाठिंब्याची गरज असल्याचे म्हटले आहे.