साऊथचे लोकप्रिय कपल सामंथा प्रभु (Samantha Akkineni) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) घटस्फोट घेणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती. ही चर्चा अखेर खरी ठरली. काल सामंथा व नागा चैतन्य दोघांनीही सोशल मीडियावर घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. या दोघांत काय नेमकं काय बिघडलं, हे कळायला मार्ग नाही. पण आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut ) या घटस्फोटासाठी खापर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या (Aamir Khan) डोक्यावर फोडलं आहे. नागा चैतन्य व सामंथा यांच्या घटस्फोटाचा आमिर खानशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला कंगनाची इन्स्टा स्टोरी वाचावी लागेल.
आमिर खान व त्याची पत्नी किरण राव यांनी काय दिवसांपूर्वीच घटस्फोटाची घोषणा केली होती. ही घोषणा केली त्यावेळी आमिर खान लडाखमध्ये आपल्या ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमाचं शूटींग करत होता. नागा चैतन्य हा सुद्धा आमिरसोबत लडाखमध्ये होता. या पार्श्वभूमीवर कंगनाने तिचा तर्क मांडला आहे.
तिच्या इन्स्टा स्टोरीत ती लिहिते, ‘एका साऊथ अॅक्टरने लग्नाच्या 4 वर्षानंतर आणि 10 वर्षांपेक्षा अधिकच्या रिलेशनशिपनंतर अचानक पत्नीला घटस्फोट दिला. हा साऊथ अभिनेता अलीकडे बॉलिवूडच्या एका सुपरस्टारच्या संपर्कात होता. ज्याला बॉलिवूडच्या घटस्फोटाचा तज्ज्ञ मानलं जातं. त्याने अनेक महिला व मुलांचं आयुष्य बर्बाद केलं. अनेकांना त्यानं भडकवंल. मी कोणाबद्दल बोलतेय, ते सर्वांनाच ठाऊक आहे.’ कंगनाच्या या पोस्टमध्ये बॉलिवूडच्या त्या सुपरस्टारचे नाव नाही. पण तिचा इशारा आमिर खानकडे आहे, हे कोणापासूनही लपून राहिलेलं नाही.
काल शनिवारी नागा चैतन्य व सामंथा यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. नागा चैतन्य हा साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा आहे. सामंथा व नागा हे दोघं 2014 साली ‘ऑटोनागर सूर्या’ या सिनेमाच्या शूटींगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2017 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. गोव्यात धुमधडाक्यात हे लग्न पार पडलं होतं. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती.
चर्चा तर ही...लग्नानंतर सामंथाने तिचं सिनेमा करिअर सुरु ठेवलं होतं. सिनेमात बोल्ड सीन्स देणे,इतकेच नाहीतर ग्लॅमरस फोटोशूटही ती करायची.हीच बाब पति नागा चैतन्य आणि सासरे नागार्जुन यांना या गोष्टी अजिबात आवडत नव्हती,असेम्हटलं जातंय. सामंथाला याविषयी अनेकदा दोघांनी समजवण्याचा प्रयत्न केला होता. अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर सामंथाने सासू अमाला अक्किनेनीसारखंच वागायला हवं,अशी सगळ्यांची अपेक्षा होती.सामंथाला हा विरोध खटक होता. अखेर याच कारणामुळे दोघांचा घटस्फोट झाल्याचं मानलं जातंय.