Join us

लग्नानंतर रितेश देशमुखने सोडायला लावली होती अ‍ॅक्टिंग?, त्यावर जिनिलिया म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 4:49 PM

Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुखने तिच्या अभिनय कारकिर्दीबाबत मौन सोडले आहे.

जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक मानली जाते. दोघांचे प्रेम सर्वश्रुत आहे. ते दोघे सोशल मीडियावर सक्रीय असून ते व्हिडीओ फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की, लग्नानंतर जिनिलियाने अभिनयातून ब्रेक का घेतला होता. यासाठी रितेश जबाबदार आहे का, असे अनेकदा जिनिलियाला विचारले जाते. अलीकडेच, अभिनेत्रीला विचारण्यात आले की रितेशने तिला अभिनय करण्यास मनाई केली आहे का, ज्यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की अभिनय करायचा की नाही हा तिचा निर्णय आहे. जेनेलिया बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसली. नुकतेच तिने रितेशसोबत मराठी सुपरहिट वेडमध्ये काम केले आहे.

जिनिलिया आणि रितेशची जोडी पहिल्यांदा तुझे मेरी कसम या चित्रपटात एकत्र दिसली होती. २०१२ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. लग्नाआधी दोघेही बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांनी हे जगाला कळूही दिले नाही. लग्नाच्या दोन वर्षानंतर, त्यांना रियान नावाचा पहिला मुलगा झाला, तर २०१६ मध्ये त्यांना दुसरे मूल झाले, ज्याचे नाव त्यांनी राहिल ठेवले.

जिनिलियाने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, मला खात्री आहे की लोक त्यांना जे काही म्हणायचे आहे ते बोलतील पण वस्तुस्थिती अशी आहे की मी आजपर्यंत स्वतः निर्णय घेत आले आहे. जसे लोक म्हणतात, 'तू जास्त काम का करत नाहीस?' मला वाटत नाही की मी इतकं काम करू शकेन, मला माझ्या मुलांसोबत राहून पूर्ण आनंद घ्यायचा असतो. वर्क फ्रंटवर, अभिनेत्री लवकरच आलिया सेनच्या ट्रायल पीरियड चित्रपटात दिसणार आहे. जिनिलियाशिवाय या चित्रपटात शक्ती कपूर, गजराज राव, शीबा चड्ढा आणि झिदान ब्राझ यांच्याही भूमिका आहेत. २१ जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित होईल. .

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुख