Join us

'भूलभुलैया 3'साठी तब्बूने दिला नकार; 'या' एका कारणामुळे सिनेमातून झाली आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 10:56 IST

Bhool bhulaiyaa 3: निर्मात्यांनी तब्बूला या सिनेमासाठी विचारणाही केली होती. मात्र, तिने थेट नकार दिला.

अक्षय कुमार (akshay kumar) आणि विद्या बालन (vidya balan) यांचा भूलभुलैया ( bhool bhulaiyaa) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्यामुळे या सिनेमाचा पार्ट 2 म्हणजेच भूलभुलैया 2 हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दुसऱ्या पार्टमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन (kartik aryan), कियारा आडवाणी (kiara advani) आणि तब्बू (tabbu) महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. परंतु, आता भूलभुलैया 3 साठी ( bhool bhulaiyaa 3) तब्बूने नकार दिला आहे.

'ई-टाइम्स'च्या वृत्तानुसार, भूलभुलैया 3 मध्ये तब्बूने असावं अशी निर्मात्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी तिला ऑफरही देली होती. मात्र, आता तब्बूने या भूमिकेसाठी नकार दिला आहे. विशेष म्हणजे तिला पुन्हा मंजुलिकाची भूमिका करायची नाही यासाठी तिने नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मात्यांनी तब्बूला भूलभुलैया 3 साठी विचारणा केली होती. मात्र, मंजुलिकाची भूमिका आवडली असूनही पुन्हा तिच भूमिका करायची नाही असं कारण देत तब्बूने या भूमिकेला नकार दिला. त्यामुळे आता भूलभुलैया 3 मध्ये मंजुलिकाची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, भूलभुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन पुन्हा दिसणार की नाही हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :भूल भुलैय्यातब्बूअक्षय कुमारविद्या बालनकार्तिक आर्यनबॉलिवूड