अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी (Padmini Kolhapure) यांनी एक काळ गाजवला आहे. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. वयाच्या ७ व्या वर्षापासूनच अभिनयाच्या करकीर्दीला सुरुवात केली होती. प्रेम रोग, गहराई, सत्यम शिवम सुंदरम, जिंदगी, वो ७ दिन, सौतन, इन्साफ का तराजू अशा बऱ्याच हिट चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. ऋषी कपूर, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती या बॉलिवूडच्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
पद्मिनी कोल्हापुरे यांचा चिमणी पाखरं हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला. मंथन, प्रवास अशा काही मराठी चित्रपटात त्यांनी काम केले. पद्मिनी कोल्हापुरे यांनी निर्माते टूटू शर्मासोबत लग्न करत संसार थाटला 14 ऑगस्ट 1986ला दोघांनी लग्न केले. त्यांच्या मुलाचे नाव प्रियांक शर्मा आहे. प्रियांकचा जन्म ४ फेब्रुवारी १९९० ला झाला.
प्रियांकने 'सब कुशल मंगल' सिनेमातून डेब्यू केला. ज्यामध्ये रवी किशनची मुलगी रीवानाने पदार्पण केले. शाजाने 'ऑलवेज कभी कभी' आणि 'हॅपी न्यू इयर'सारख्या सिनेमांसाठी असिस्टेंट डारेक्टर म्हणून काम केले आहे. प्रियांक शर्माने गेल्यावर्षी प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजासोबत कोर्ट मॅरेज केलं.
त्याने अतिशय साधेपणाने लग्न केले. केवळ त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी शानदार पार्टी दिली. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. शाझा ही सुद्धा एक असिस्टंट डायरेक्टर आहे. तिने ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.