Join us

गोविंदाची पहिली आणि मोठी मुलगी टीना नाही, खुद्द चिचीने केला होता भावनिक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 5:01 PM

विरारचा छोरा अशी ओळख असणा-या गोविंदाचं आयुष्य मुंबापुरीतच गेलंय. त्याच्या जीवनाविषयी ब-याच गोष्टी कायमच ऐकायला मिळतात. मात्र गोविंदाच्या आयुष्याविषयी काही गोष्टी क्वचितच ऐकायला मिळतात.

बॉलीवुडचा हिरो नंबर वन म्हणजे गोविंदा. आपला डान्स,कॉमेडी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभिनय याने गोविंदाने रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमात नंबर वन बनत त्याने रसिकांना खळखळून हसवलं, कधी संवेदनशील भूमिका साकारत रसिकांना रडवलंही तर कधी कधी रोमँटिक अंदाजात त्याने सा-यांची मनं जिंकली. त्यामुळे गोविंदा रसिकांचा लाडका चिची बनला. 

विरारचा छोरा अशी ओळख असणा-या गोविंदाचं आयुष्य मुंबापुरीतच गेलंय. त्याच्या जीवनाविषयी ब-याच गोष्टी कायमच ऐकायला मिळतात. मात्र गोविंदाच्या आयुष्याविषयी काही गोष्टी क्वचितच ऐकायला मिळतात. टीना म्हणजेच नर्मदा ही गोविंदाची मोठी लेक आहे हे सा-यांनाच माहिती आहे. मात्र असं असलं तरी टीना ही गोविंदाची थोरली लेक नाही. कारण टीनाआधी गोविंदाला एक मुलगी झाली होती. मात्र अवघ्या ४ महिन्यांची असताना तिचा मृत्यू झाला होता. 

खुद्द चिचीने याचा एका मुलाखतीत हा भावनिक खुलासा केला होता. ती एक प्रीमॅच्युअर बेबी होती, त्यामुळे तिचा मृत्यू झाला असं गोविंदाने सांगितले होते. याशिवाय कुटुंबातील जवळच्या ११ व्यक्तींचा मृत्यू पाहिला असल्याचे चिचीने सांगितले होते.मुलीसह वडील, आई, दोन भाऊ, मेहुणे आणि बहिणीचा मृत्यू मी पाहिला आहे असं गोविंदाने या मुलाखतीत सांगितले होते. या काळात कंपनी बंद पडल्याने आणि उत्पन्नाचे कोणतंही दुसरं साधन नसल्यानेोत्यांच्या मुलांना आपणच लहानाचे मोठे केल्याचेही त्याने स्पष्ट केले होते.या काळात भावनिक आणि आर्थिक दबाव होता असंही चिचीने यावेळी सांगितले होते.

टीनाने मिले ना तुम या गाण्याने टीव्ही इंटस्ट्रीत डेब्यू केला होता. यु-ट्युबवर टीनाच्या या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली होती.२०१५ मध्ये सेकंड हॅंड हसबॅंड या चित्रपटाद्वारे टीनाने आपल्या करिअरची सुरवात केली.मात्र बॉलिवूडमध्ये तिला हवे तसे यश मिळाले नाही.

 

त्यामुळे इतर स्टारकिड्सप्रमाणे टीना आहुजा समोर आलीच नाही. सोशल मीडियावर ती सक्रीय असते. चाहत्यांसह आपले फोटो व्हिडीओ शेअर करत असते. टीनाने आपले शिक्षण लंडनमध्ये पूर्ण केले आहे. टीनाने फॅशन डिझायनिंगचेही शिक्षण घेतले आहे. 

टॅग्स :गोविंदा