अभिनेता ह्रतिक रोशन आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच तो दीपिका पादुकोणसोबत 'रामायणा'वर आधारित सिनेमात रामाच्या भूमिकेत दिसू शकतो. ह्रतिकने त्याच्या करिअरची सुरुवात 'कहो ना प्यार है' या सिनेमातून केली. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगले यश मिळाले आणि त्यासोबत ह्रतिकच्या करिअरलाही. या सिनेमाला फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार देखील मिळाले. पहिल्याच सिनेमासाठी ह्रतिकला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. एका रात्रीत ह्रतिक स्टार झाला होता.
कहो ना प्यार है या चित्रपटानंतर मुली हृतिकच्या मागे अक्षरशः वेड्या झाल्या होत्या. या चित्रपटानंतर हृतिकला लग्नाचे 30 हजार प्रस्ताव आले होते. याचा खुालासा ह्रतिक रोशनने 'द कपिल शर्मा शो'मध्ये केला होता. ह्रतिक यानंतर आपली मैत्रिण सुझैन खानसोबत लग्न केलं. लग्नाच्या 13 वर्षानंतर 2014ंमध्ये दोघांचा घटस्फोट झाला. ह्रतिक आणि सुझैनला रेहान आणि रिधान अशी दोन मुलं देखील आहेत.
पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटासाठी हृतिक हा निर्मात्यांची पहिली चॉईस कधीच नव्हता. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनीच केली आहे. राकेश रोशन यांनी कहो ना प्यार है या चित्रपटाच्या आधी देखील करण अर्जुन, कोयला यांसारख्या अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये शाहरुख खानने काम केले होते.