Join us

तुम्हाला माहित आहे का करिना कपूरने नाकारलेत हे दोन ब्लॉकबस्टर सिनेमे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 7:18 AM

बॉलिवूड स्टार करिना कपूर एक गुणी अभिनेत्री आहे, यात काहीही शंका नाही. लग्नानंतरही करिनाचा स्टारडम कमी झालेला नाही. अगदी ...

बॉलिवूड स्टार करिना कपूर एक गुणी अभिनेत्री आहे, यात काहीही शंका नाही. लग्नानंतरही करिनाचा स्टारडम कमी झालेला नाही. अगदी कालपरवा रिलीज झालेला ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट पाहिल्यानंतर कुणालाही याचा अंदाज येईल. ३७ वर्षाच्या या अभिनेत्रीच्या नावे अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे आहेत. ‘कभी खुशी कभी गम’,‘ जब वुई मेट’,‘बॉडीगार्ड’,‘३ इडियट्स’ असे अनेक सिनेमे करिनाने गाजवलेत. पण याच करिनाने दोन ब्लॉकबस्टर सिनेमे स्वत:हून नाकारलेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? होय, ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘गोलियों की रासलीला रामलीला’ हे ते दोन सिनेमे. हे दोन्ही चित्रपट किती हिट झालेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. दीपिका पादुकोणच्या वाट्याला गेलेल्या या दोन्ही चित्रपटांनी बॉक्सआॅफिसवर अभूतपूर्व यश मिळवले.  दोन्ही सिनेमे आधी करिनाला आॅफर झाले होते. पण तारखा नसल्यामुळे करिनाने ते नाकारले होते. पुढे ते दीपिकाच्या झोळीत पडले आणि इतिहास घडला. करिना करिअरमधील दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांना मुकली. पण अर्थातच याचा पश्चाताप करण्यांपैकी करिना नाहीच. याचा तिला जराही पश्चाताप असेल, असे आम्हाला वाटत नाही. पण तिच्या चाहत्यांना मात्र नक्कीच पश्चाताप होत असणार.ALSO READ : तब्बल 9 वर्षांनंतर करिना कपूर-अक्षय कुमार शेअर करणार स्क्रिन! लवकरच करण जोहर अक्षय कुमार आणि करिना कपूर यांना घेऊन चित्रपट तयार करतो आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात करिना कपूर आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या अपोझिट अक्षय कुमारला कास्ट करण्यात आले आहे. पण करिना कपूरशी या भूमिकेबाबत चर्चा सुरु आहे. करिनाला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे आणि लवकरच ती यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे. यात करिना आणि अक्षयशिवाय आणखीन एक कपल दाखवले जाणार आहे. चित्रपटाच्या कथेबाबत बोलायचे झाले तर ती अजून स्पष्ट नाही झाली.