कलेवर एखाद्याची निष्ठा, प्रेम असेल तर त्या कलेसाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते. वाटेत कितीही संकटं आली तरी ती व्यक्ती डगमगत नाही. त्यावर मात करत कलेसाठी सर्वस्व पणाला अर्पण करणारे समाजात मोजकेच असतात. अशाच कलाप्रेमी व्यक्तींमध्ये मुग्धा गोडसेचे नाव गणले जाते. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते हेच मुग्धाने सिद्ध करून दाखवलंय.
मुग्धाने 2002 मध्ये मेगा मॉडेल हंट जिंकून तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरूवात केली. यानंतर मुग्धाला बर्याच मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या. 2004 साली मुग्धाने मिस इंडिया स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मुग्धाने 'चूप चप खडसे हो', 'लेकर हम दीवाना दिल' अशा अनेक हिंदी अल्बममध्ये काम केले आहे.
मधुर भंडारकर दिग्दर्शित 'फॅशन' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या या मुग्धाचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली मुग्धा एकेकाळी पेट्रोल पंपावर तेल विकून केवळ 100 रुपयांमध्ये आपला उदरनिर्वाह करायची. तर पॉकेट मनीच्या रुपात घरुन तिला केवळ 300 रुपये मिळायचे.
आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुग्धा लहान-मोठे काम करायची. आर्थिक हातभार लावण्यासाठी मिळेल ते काम करण्याची मुग्धाची तयारी होती. त्यामुळे अगदी लहान काम करायला सुरुवात केली होती. मुग्धाचाही आयुष्यात दररोज संघर्ष होता. मात्र कधीच हार मानली नाही. उलट यातूनच नवीन नवीन गोष्टी करता करता ती मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री झाली. कुणीही गॉडफादर नसताना मुग्धाने आज मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
मुग्धा गोडसे आता तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. मुग्धाने नुकतेच राहुलसोबत तिचे असलेले रिलेशनशीपबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितले की, "राहुलसोबत असल्याची एक स्पेशल भावना मनात आहे. आमच्या दोघांच्या घरच्यांना आमच्या नात्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही.
सध्या लग्नाचा विचार केला नसून जेव्हा व्हायचे असेल तेव्हा लग्न होईल" असे तिने सांगितले. राहुल आणि मुग्धा नेहमी एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. मुग्धाच्या इन्सटाग्रामवर नजर टाकली असता तिचे अकाउंट राहुलसोबतच्या फोटोंनी भरलेले आहे.