Join us

इमरान खानची पत्नी अवंतिका मलिकचे त्याच्यासोबत लग्न होण्याआधी या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होते अफेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 6:00 AM

गेल्या काही दिवसांपासून इमरान त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. इमरान आणि अवंतिकामध्ये दुरावा आला असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून ऊत आला आहे

ठळक मुद्देकाही वर्षांनी अवंतिका आणि रणबीर यांची खूप चांगली मैत्री झाली होती. एवढेच नव्हे तर ते दोघे पाच वर्षं नात्यात देखील होते. पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले आणि अवंतिकाच्या आयुष्यात इमरान आला आणि त्यांनी काही वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले.

बॉलिवूड अभिनेता इमरान खान आणि अवंतिका मलिक यांच्या लग्नाला जवळपास आठ वर्षं झाली आहेत. लग्नाच्या आधी ते एकमेकांना जवळपास आठ वर्ष डेट करत होते. गेल्या काही दिवसांपासून इमरान त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. इमरान आणि अवंतिकामध्ये दुरावा आला असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून ऊत आला आहे. सध्या अवंतिका इमरानचे घर सोडून आपल्या आई-वडिलांच्या घरी शिफ्ट झाली आहे. 

अवंतिकासोबत मुलगी इमाराला देखील ती माहेरी घेऊन आली आहे. इमरान- अवंतिकाचे कुटुंबीय आणि मित्र त्यांच्या वाद मिटवण्याचा प्रयत्न शर्थीने करतायेत. अवंतिकाच्या आईने मीडियात कबूल केले होते की, इमरान आणि अवंतिका यांच्यात काही वाद झाले असून ते मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ते वेगळे होणार असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर अवंतिकाने इन्स्टाग्रामवरील तिच्या नावातून आता खान काढून टाकून तिचे इन्स्टावर केवळ अवंतिका मलिक असेच ठेवले आहे. त्यावरून तर चर्चांना आणखीन ऊत आला आहे.

अवंतिका मलिक ही देखील अभिनेत्री असल्याचे तुम्हाला माहीत आहे का... खूप वर्षांपूर्वी जस्ट मोहोब्बत ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत अवंतिकाने काम केले होते. या मालिकेत ती बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेच्यावेळी तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूरचे देखील त्यावेळी तिच्यावर क्रश होते आणि केवळ तिला पाहाण्यासाठी तो जस्ट मोहोब्बते या मालिकेच्या सेटवर जायचा. 

काही वर्षांनी अवंतिका आणि रणबीर यांची खूप चांगली मैत्री झाली होती. एवढेच नव्हे तर ते दोघे पाच वर्षं नात्यात देखील होते. पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले आणि अवंतिकाच्या आयुष्यात इमरान आला आणि त्यांनी काही वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. पण ब्रेकअपनंतरही रणबीर आणि अवंतिका एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स राहिले. त्यांना ब्रेकअपनंतरही अनेकवेळा एकत्र  पाहाण्यात आले होते. 

टॅग्स :रणबीर कपूर