संजय लीला भन्साळी ( Sanjay Leela Bhansali) यांच्या 'सावरियाँ' (saawariya) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रणबीर कपूर (ranbir kapoor). आपल्या उत्तम अभिनयशैली आणि गुड लुकिंगमुळे रणबीर आज अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 'सावरियाँ', 'संजू', 'अजब प्रेम की गजब काहानी' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेल्या रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. यामध्येच रणबीरशी निगडीत एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, गेल्या कित्येक वर्षांपासून रणबीर एका आजाराशी लढा देत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरला नेजल डिव्हिएट सेप्टम (Nasal Deviated Septum) हा आजार आहे. त्यामुळे बऱ्याचदा रणबीर बोलताना अडखळतो. इतकंच नाही तर, त्यामुळे तो अनेकदा भराभर बोलतो किंवा त्याच वेगाने तो जेवतोदेखील.
दरम्यान,गेल्या कित्येक वर्षांपासून रणबीर या आजाराचा सामना करत आहे. मात्र, या आजारावर तो हळूहळू मात करत असल्याचं सांगण्यात येतं. सध्या रणबीर त्याच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहे.